Homeताज्या बातम्या

कोलंबियात भूकंपात मृतांची संख्या १३२ वर; ५७० हून अधिक जखमी, मृतांची संख्या वाढण्याची भीती

बोमोटा : कोलंबियाला सोमवारी ७.४ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भीषण नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान १३२ जणांचा मृत्यू झाला

पूर्णवादी बँकेत पारनेरकर महाराजांच्या जन्मतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन; २५ शाखांमधून सामाजिक बांधिलकी
भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! ‘ब्लू’ ऐवजी भगवा रंग; माजी कर्णधार विरेन रासकिन्हा संतापला
मुंबईत ‘रंगशारदा’ हॉटेलवर ईडीची मोठी कारवाई; तब्बल ३३२ कोटींची मालमत्ता जप्त, आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका
Colombia Earthquake Death Toll Mounts To 132, Over 570 Injured; World  Leaders Express Solidarity

बोमोटा : कोलंबियाला सोमवारी ७.४ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भीषण नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान १३२ जणांचा मृत्यू झाला असून, ५७० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक भागांतील इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ढिगाऱ्याखाली नागरिक अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भूकंपाचा सर्वाधिक फटका परेरा शहराला बसला असून, येथेच ६० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. राजधानी बोगोटासह देशातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. अचानक जमीन हादरू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि अनेकांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर धाव घेतली. भूकंपाचा केंद्रबिंदू चोको प्रांतातील सॅन जोसे डेल पाल्मारजवळ जमिनीखाली सुमारे १७० किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात आले. मुख्य भूकंपानंतरही परिसरात अनेक धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आणखी धक्के बसण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. भूकंपानंतर आपत्ती व्यवस्थापन पथके, लष्कर आणि अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र नोंदणी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून, त्यातील बहुतांश प्रकरणे काली आणि परेरा शहरांशी संबंधित आहेत. राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो डी ला एस्प्रिएला यांच्या माहितीनुसार, भूकंपामुळे १ हजार ५७७ हून अधिक निवासी इमारतींचे नुकसान झाले आहे. त्यापैकी ३७ इमारती पूर्णपणे कोसळल्या आहेत. याशिवाय ६० हून अधिक इतर इमारती, १८ आरोग्य केंद्र आणि ५२ शाळांनाही मोठा फटका बसला आहे. काली शहरातील विद्यापीठ रुग्णालयाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रुग्णालयाच्या सुमारे ३० टक्के भागाची पडझड झाल्याचे प्रशासनाने सांगितले. बालरोग, अंतर्गत औषधोपचार आणि नवजात शिशु विभागाला विशेष फटका बसला आहे. ढिगाऱ्याखाली रुग्ण अडकले असण्याची शक्यता असल्याने बचाव पथके अत्यंत काळजीपूर्वक शोधमोहीम राबवत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव काली शहरातील अन्य काही आरोग्य केंद्रही रिकामी करण्यात आली आहेत. इमारतींची सुरक्षितता तपासणे आणि पायाभूत सुविधांची पाहणी करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. अमेरिकेकडून मदतीची घोषणा या भीषण संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी कोलंबियाला मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेने अन्न, निवारा आणि नुकसानीचे मूल्यांकन यासााठी १ कोटी ५५ लाख डॉलरची मदत जाहीर केली आहे. भूकंपग्रस्त भागात शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याला बचाव पथकांनी प्राधान्य दिले आहे. मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून, नुकसानीचे अंतिम चित्र बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

COMMENTS