Homeताज्या बातम्याअहमदनगर

कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची तपासणी

कोपरगाव शहर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची आष्टी येथील तपासणी पथकाने नुकतीच तपासणी केल्याची

सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम  शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन
देवळालीत हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा चौघांवर गुन्हा ; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त
 कोपरगाव तहसीलमध्ये आज आ. काळेंचा जनता दरबार  

कोपरगाव शहर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची आष्टी येथील तपासणी पथकाने नुकतीच तपासणी केल्याची माहिती कोपरगाव तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तथा प्रशासक संदीप दळवी यांनी दिली आहे.शासनाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबवले जात असून या अंतर्गत तालुक्यातील ब्राह्मणगाव, चांदेकसारे, चासनळी, धामोरी, धोत्रे, डाऊच बु,करंजी बु,कोळपेवाडी, कुंभारी, माहेगाव देशमुख, पोहेगाव, रवंदे, सडे, सांगवी भुसार, संवत्सर, शहाजापूर, सोनेवाडी, टाकळी, वारी, येसगाव या २१ ग्रामपंचायतीची तपासणी आष्टीचे गटविकास अधिकारी बागलाण, विस्तार अधिकारी जायभाय, बहिर, डाटा एन्ट्री ऑपरेटर किरण खिल्लारे, अभियंता मुकुल, चालक श्री शेख आदींच्या पथकाने करत गावातील ग्रामपंचायत अभिलेखे, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, तलाठी कार्यालय, स्मशानभूमी, पिण्याच्या पाण्याची सोय आधी ठिकाणांची पाहणी केली.या पथकाने तालुक्यातील करंजी बु या गावात भेट दिली असता गावातील ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी, पाण्याची सोय, गावचा परिसर बघत समाधान व्यक्त केले. या पथकासोबत कोपरगाव तालुका विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे उपस्थित होते तर गावचे सरपंच रवींद्र आगवन, उपसरपंच शिवाजी जाधव, शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप भाकरे, ग्रामविकास अधिकारी संदीप थोरात आदी उपस्थित होते.

COMMENTS