Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना ठाणे कारागृहात १७८ व्या शहीद दिनी मानवंदना

ज्यांनी इंग्रज सत्तेला सळो की पळो करून सोडलं, अशा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा १७८ वा शहीद दिन ठाण्यात मोठ्या उत्साहात आणि शासकीय सन्मानान

आढळगाव शाळेला नवे वर्ग; वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी २४ लाखांची मंजुरी
आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना ठाणे कारागृहात १७८ व्या शहीद दिनी मानवंदना
मंत्री भुजबळ यांचे सभापती राम शिंदेंकडून स्वागत  

ज्यांनी इंग्रज सत्तेला सळो की पळो करून सोडलं, अशा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा १७८ वा शहीद दिन ठाण्यात मोठ्या उत्साहात आणि शासकीय सन्मानाने पार पडला. २ मे १८४८ रोजी ज्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली होती, तिथेच आज आदरांजलीचा मुख्य सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात राघोजी भांगरे चौकातील पुष्पांजलीने झाली. तिथून हातात मशाल घेऊन सर्व मान्यवर आणि आदिवासी बांधव मिरवणुकीने ठाणे मध्यवर्ती कारागृहात दाखल झाले. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला खासदार हेमंत सावरा, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि आमदार संजय केळकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कारागृहातील स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर, मुख्य मान्यवरांनी ‘फाशी गेट’वर जाऊन जिथे राघोजींना फाशी दिली होती, तिथे नतमस्तक होत अभिवादन केले. यावेळी राघोजी भांगरे यांचे वारसदार सुनील भांगरे यांनी कारागृहातील स्मारकाशेजारी क्रांतीवीरांचा अर्धपुतळा बसविण्याची आग्रही मागणी केली.
यावेळी बोलताना मंत्री अशोक उईके यांनी समाजाला एकजुटीचे आवाहन केले. पुढील वर्षापासून हा कार्यक्रम संपूर्ण दिवसभर साजरा करण्यात येईल आणि आदिवासी क्रांतीवीरांची माहिती पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तर आमदार संजय केळकर यांनी स्मारकासाठी आमदार निधीतून मदत करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमासाठी ठाणे, पालघर, नाशिक आणि अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यांतून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राघोजी भांगरे यांच्या बलिदानाच्या स्मृती आजही समाजाला प्रेरणा देत आहेत, हेच या जनसमुदायाने दाखवून दिले.

COMMENTS