अहिल्यानगर : जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होऊनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांचा वेग मंदावला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३ लाख ११ हजार २३९ हेक्टरवर पेरणी झाली असून ती अपेक्षित क्षेत्राच्या केवळ ५४ टक्के आहे. पावसाने आणखी खंड दिल्यास खरीप हंगामावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने पेरण्या संथ गतीने सुरू आहेत. गेल्या आठवड्यात घाटमाथा व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला असला, तरी जिल्ह्याच्या बहुतांश भागात केवळ भिज पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा तडाखा वाढला असून पेरणी झालेली पिके करपू लागल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात सोयाबीननंतर सर्वाधिक पेरणी होणार्या बाजरी पिकाची अवघ्या 19 हजार 433 हेक्टरवर (13 टक्के), मूग पिकाची 9 हजार 826 हेक्टरवर (21 टक्के) आणि उडिद पिकाची 1 हजार 629 हेक्टरवर (22 टक्के) पेरणी झालेली आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक भात पिकांची लागवड होत असून आतापर्यंत या ठिकाणी 1 हजार 320 हेक्टरवर अवघी 8 टक्के लागवड झालेली आहे. यामुळे तालुक्यातील डोंगरगाळ भागातील भाताची खेचर रिकामी दिसत आहेत.आतापर्यंत झालेल्या भिज पावसात मका पिकाची 44 हजार 970 हेक्टरवर, तूरी 47 हजार 612 हेक्टरवर पेरणी झालेली आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची पेरणी ही 3 लाख 11 हजार 239 हेक्टरवर झालेली असून पेरणी टक्केवारी ही 54 टक्के झालेली आहे. जिल्ह्यात पावसाने उघडीप दिलेली असून आता पुढील दहा ते पंधरा दिवस पावसाचा खंड राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. तसेच झाल्यास जिल्ह्यातील खरीप हंगामाचे भवितव्य अडचणीचे होणार आहे. पिकनिहाय पेरणीचे क्षेत्र भात 1 हजार 320 हेक्टर (8 टक्के), ज्वारी 59 हेक्टर (10. 4 टक्के), बाजरी 19 हजार 433 हेक्टर (13 टक्के), नाचणी 26. 27 हेक्टर (10.4 टक्के), मका 45 हजार हेक्टर (74 टक्के), तूर 47 हजार 612 हेक्टर (131.29 टक्के), मूग 9 हजार 826 हेक्टर 20.9 हेक्टर, तीळ 27 हेक्टर (19.3 टक्के), कारळे 52.1 हेक्टर (15.6 टक्के), सोयाबीन 56 हजार 350 हेक्टर (66 टक्के) आणि कपाशी 1 लाख 5 हजार 564 हेक्टर (86 टक्के).

अहिल्यानगर : जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होऊनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांचा वेग मंदावला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३ लाख ११ हजार २३९ हेक्टरवर पेरणी झाली असून ती अपेक्षित क्षेत्राच्या केवळ ५४ टक्के आहे. पावसाने आणखी खंड दिल्यास खरीप हंगामावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने पेरण्या संथ गतीने सुरू आहेत. गेल्या आठवड्यात घाटमाथा व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला असला, तरी जिल्ह्याच्या बहुतांश भागात केवळ भिज पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा तडाखा वाढला असून पेरणी झालेली पिके करपू लागल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात सोयाबीननंतर सर्वाधिक पेरणी होणार्या बाजरी पिकाची अवघ्या 19 हजार 433 हेक्टरवर (13 टक्के), मूग पिकाची 9 हजार 826 हेक्टरवर (21 टक्के) आणि उडिद पिकाची 1 हजार 629 हेक्टरवर (22 टक्के) पेरणी झालेली आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक भात पिकांची लागवड होत असून आतापर्यंत या ठिकाणी 1 हजार 320 हेक्टरवर अवघी 8 टक्के लागवड झालेली आहे. यामुळे तालुक्यातील डोंगरगाळ भागातील भाताची खेचर रिकामी दिसत आहेत.आतापर्यंत झालेल्या भिज पावसात मका पिकाची 44 हजार 970 हेक्टरवर, तूरी 47 हजार 612 हेक्टरवर पेरणी झालेली आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची पेरणी ही 3 लाख 11 हजार 239 हेक्टरवर झालेली असून पेरणी टक्केवारी ही 54 टक्के झालेली आहे. जिल्ह्यात पावसाने उघडीप दिलेली असून आता पुढील दहा ते पंधरा दिवस पावसाचा खंड राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. तसेच झाल्यास जिल्ह्यातील खरीप हंगामाचे भवितव्य अडचणीचे होणार आहे.
पिकनिहाय पेरणीचे क्षेत्र
भात 1 हजार 320 हेक्टर (8 टक्के), ज्वारी 59 हेक्टर (10. 4 टक्के), बाजरी 19 हजार 433 हेक्टर (13 टक्के), नाचणी 26. 27 हेक्टर (10.4 टक्के), मका 45 हजार हेक्टर (74 टक्के), तूर 47 हजार 612 हेक्टर (131.29 टक्के), मूग 9 हजार 826 हेक्टर 20.9 हेक्टर, तीळ 27 हेक्टर (19.3 टक्के), कारळे 52.1 हेक्टर (15.6 टक्के), सोयाबीन 56 हजार 350 हेक्टर (66 टक्के) आणि कपाशी 1 लाख 5 हजार 564 हेक्टर (86 टक्के).

COMMENTS