Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना ठाणे कारागृहात १७८ व्या शहीद दिनी मानवंदना

https://www.youtube.com/watch?v=sU3I_04Fksc ज्यांनी इंग्रज सत्तेला सळो की पळो करून सोडलं, अशा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा १७८ वा शही

काँग्रेसचे ‘संघटन सृजन अभियान’ सर्वांना सोबत घेणारे; माजी प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर ; संगमनेरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात
बारामती, राहुरी निवडणुकीचे चित्र अस्पष्ट; अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच बिनविरोधचे चित्र होईल स्पष्ट
राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी

ज्यांनी इंग्रज सत्तेला सळो की पळो करून सोडलं, अशा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा १७८ वा शहीद दिन ठाण्यात मोठ्या उत्साहात आणि शासकीय सन्मानाने पार पडला. २ मे १८४८ रोजी ज्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली होती, तिथेच आज आदरांजलीचा मुख्य सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात राघोजी भांगरे चौकातील पुष्पांजलीने झाली. तिथून हातात मशाल घेऊन सर्व मान्यवर आणि आदिवासी बांधव मिरवणुकीने ठाणे मध्यवर्ती कारागृहात दाखल झाले. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला खासदार हेमंत सावरा, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि आमदार संजय केळकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

COMMENTS