श्रीगोंदा :ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हावे, या उद्देशाने तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान, श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) यांनी शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये मास्टर ऑफ लॉज (एलएल.एम.), आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हे आधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून, त्यामुळे श्रीगोंदा तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण आणि करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान अंतर्गत कार्यरत श्री शिवाजीराव नागवडे विधी महाविद्यालय, श्रीगोंदा येथे मानव विज्ञान शाखेअंतर्गत मास्टर ऑफ लॉज (एलएल.एम.) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. याचबरोबर सोनिया गांधी पॉलिटेक्निक, श्रीगोंदा येथे सध्याच्या तंत्रज्ञानप्रधान युगातील सर्वाधिक मागणी असलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. डिजिटल तंत्रज्ञान, डेटा सायन्स, ऑटोमेशन, रोबोटिक्स, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्री ४.० च्या वाढत्या गरजा लक्षात घेता हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शिवाजीराव नागवडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व रोजगाराभिमुख शिक्षण त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. बदलत्या शैक्षणिक आणि औद्योगिक गरजांचा सातत्याने अभ्यास करून विद्यार्थ्यांना भविष्यात सक्षम बनविणारे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्था कायम प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS