Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र दिनी रिया ओव्हाळचा सत्कार

बीड : शहरातील प्रकाश आंबेडकर नगर परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणार्‍या रिया उत्तम

समता इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या परीक्षेत यश 
दहावी परीक्षेत जगदंबा विद्यालयाचे यश 
नागवडे स्कूलची १००% निकालाची परंपरा कायम

बीड : शहरातील प्रकाश आंबेडकर नगर परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणार्‍या रिया उत्तमराव ओव्हाळ हिचा महाराष्ट्र दिनी शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बार्शी नाका परिसरातील प्रकाश आंबेडकर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वकृत्व स्पर्धा विशेष लक्षवेधी ठरली. या स्पर्धेत रिया ओव्हाळ हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम पारितोषिक मिळवले होते. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अशोक नगर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक सुनील कुरलेकर, अब्दुल नियाजी, हाकी मणियार, केंद्रप्रमुख सय्यद मुखीद जाफर, आचार्य सर, मंगल चव्हाण, माया तेलंगण, लता काकडे, मनीषा फुंदे, सय्यद मुमताज, नंदाबाई कागदे, शिवकन्या सोनवणे, उषा कुलथे, शारदा मिटकरी, शोभा कदम, वीर विलास, विठ्ठल जायभाये, सखाराम शिंदे, संजय दराडे, संगीता वाघमारे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रिया ओव्हाळ हिचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS