Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशाचे शिखर गाठले! सरस्वती कन्या प्रशालेची गार्गी गवळी एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी;केजच्या शिरपेचात मानाचा तुरा; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

केज : केज येथील माऊली विद्यापीठ संचलित सरस्वती कन्या प्रशालेची गुणवंत विद्यार्थिनी कु. गार्गी तात्या गवळी हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यव

केजमध्ये राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा जल्लोष; ‘पुणे जीएसटी’ संघाने पटकावले विजेतेपद
आश्रमशाळा अधीक्षकांचे जीवन वेठबिगारीसारखे; 24 तास ड्युटीमुळे आरोग्य धोक्यात – संघटनेचा शासनाला इशारा
केज पंचायत समिती परिसरातील बॅनर अतिक्रमण हटवण्याची; मागणी; 8 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

केज : केज येथील माऊली विद्यापीठ संचलित सरस्वती कन्या प्रशालेची गुणवंत विद्यार्थिनी कु. गार्गी तात्या गवळी हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेच्या अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील एन.एम.एम.एस. परीक्षा 28 डिसेंबर 2025 रोजी पार पडली होती. त्यानंतर 24 फेब्रुवारी 2026 रोजी प्राथमिक निकाल जाहीर झाला आणि 24 एप्रिल 2026 रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम यादीत गार्गीने आपले स्थान निश्चित करत आपली बुद्धिमत्ता आणि परिश्रम सिद्ध केले आहेत. गार्गीच्या या यशामागे सरस्वती कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. डोंगरे मॅडम यांचे सक्षम नेतृत्व आणि शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. शिक्षकांनी दिलेल्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना गार्गीचे वडील तथा पत्रकार आयु. तात्या गवळी यांनी व्यक्त केली. शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि गार्गीची जिद्द यामुळेच हे यश शक्य झाले. शाळेने घेतलेली मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले. गार्गीच्या या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक, पालक तसेच केज परिसरातील नागरिकांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला नवी प्रेरणा मिळाली असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS