Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज येथे महात्मा बसवेश्वर जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी

केज : केज येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील महान

सुट्टीत आजोळी आलेल्या तरुणाने केला मामाच्या दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार ; केज तालुक्यात महिला अत्याचाराची आठवड्यातील तिसरी घटना
केजमध्ये खा.बजरंग सोनवणे यांनी अर्पण केली महामानवाला मानवंदना!
उमरी/सावंतवाडी प्रीमियर लीगवर ‘यजमान’ उमरी संघाचे वर्चस्व; दहीटना उपविजेता! विष्णुभाऊ घुले यांच्या हस्ते 51,111 चे प्रथम पारितोषिक प्रदान

केज : केज येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील महान समाजसुधारक तसेच लिंगायत धर्माचे प्रसारक होते. त्यांनी जातीभेद नाकारत समतेचा संदेश दिला. कायकवे कैलास म्हणजे श्रम हाच ईश्वर असा विचार मांडणारे ते समतानायक म्हणून ओळखले जातात. अंधश्रद्धा व कर्मकांडांना त्यांनी कडाडून विरोध केला तसेच अनुभव मंटपची स्थापना करून लोकशाही विचारांची पायाभरणी केली. जयंतीनिमित्त श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच केज येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. याचबरोबर मूकबधिर व मतिमंद निवासी विद्यालय, केज येथील विद्यार्थ्यांनाही फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला मन्मथ माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. वैजनाथ शेटे, सचिव उमाकांत बोधने, निलेश मुळे, प्रा. राजकुमार गंदगे, प्रा. रामदास कुंभार, संतोष गिराम, चंद्रशेखर शेटे, पप्पुशेठ पारशेट्टी, गोविंद डिकुळे, स्वामी, दिपक मिटकरी, दिपक हालगे, सोहम बोधने यांच्यासह डॉ. हजारे व इतर सहकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्यात आले.

COMMENTS