Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उमरी-सावंतवाडी प्रीमियर लीगचा थरार; यजमान संघाने पटकावले प्रथम पारितोषिक

केज : अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उमरी- सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्री

केज तालुक्यात अल्पवयीन मेव्हूणीवर लैंगिक अत्याचार व बलात्कार केलेल्या आरोपीविरुद्ध पोक्सो व बलात्काराचा गुन्हा नोंद
शेतकर्‍यांची मोटार व वायर चोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश; शेतकर्‍यांना दिलासा
केज उपजिल्हा रुग्णालय शस्त्रक्रियेत जिल्ह्यात अव्वल; रुग्णसेवेचा नवा उच्चांक
उमरी/सावंतवाडी प्रीमियर लीगवर 'यजमान' उमरी संघाचे वर्चस्व; दहीटना उपविजेता!  विष्णुभाऊ घुले यांच्या हस्ते 51,111 चे प्रथम पारितोषिक प्रदान ...

केज : अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उमरी- सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार उत्साहात पार पडला. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात यजमान उमरी- सावंतवाडी संघाने शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा मानाचा करंडक पटकावला.
स्पर्धेतील सामने अतिशय रोमांचक झाले असून अंतिम क्षणापर्यंत चुरस कायम होती. विविध संघांच्या दमदार कामगिरीनंतर खालीलप्रमाणे निकाल लागलाः प्रथम पारितोषिक (51,111): उमरी/सावंतवाडी संघ, द्वितीय पारितोषिकः दहीटना संघ, तृतीय पारितोषिकः केज संघ, चतुर्थ पारितोषिकः कोठी संघ, दिमाखदार बक्षीस वितरण स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना उमरी /सावंतवाडी संघाला 51,111 रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. खेळामुळे युवकांमध्ये सांघिक भावना, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित होतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अशा स्पर्धा आयोजित करणे ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोनू सावंत, नाना मुळे, गणेश मुळे, विठ्ठल मुळे, नवनाथ सावंत, विकास मुळे, रामदास मुळे यांच्यासह समस्त उमरी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. उत्कृष्ट मैदान व्यवस्था, शिस्तबद्ध नियोजन आणि खेळाडूंसाठी केलेल्या सोयी-सुविधांमुळे स्पर्धेला विशेष उठाव मिळाला. स्पर्धेला परिसरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, त्यामुळे शिवजयंतीचा उत्साह द्विगुणित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

COMMENTS