अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

निळवंडेच्या डाव्या कालव्याचे काम ८५ टक्के तर उजव्या कालव्याचे काम ७२ टक्के पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई प्रतिनिधी - अहमदनगर(Ahmednagar) जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल या

अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 
राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई प्रतिनिधी – अहमदनगर(Ahmednagar) जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी दिले. निळवंडे कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे(MP Sadashiv Lokhande)महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर(Dr. Nitin Karir) ,जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर(Deepak Kapoor) जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले(Eknath Dwale)अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले(Rajendra Bhosle) आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, निळवंडेच्या डाव्या कालव्याचे काम ८५ टक्के तर उजव्या कालव्याचे काम ७२ टक्के पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डिसेंबर अखेरपर्यंत या दोन्ही कालव्याचे काम पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे. यासाठीचे जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सुमारे ८३ गावातील नागरिकांना पाण्याचा लाभ होणार असल्याचे खासदार श्री. लोखंडे यांनी सांगितले. अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर पडणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासंदर्भात पाहणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. डॉ. साईनाथ आहेर यांनी यासंदर्भात सादरीकरण केले. यावेळी शेती महामंडळाच्या जमिनी बाबत तसेच श्रीरामपूर तालुक्यातील आकार पडीत जमिनीबाबत चर्चा करण्यात आली.

COMMENTS