Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनगणना 2027 प्रशिक्षणाला वेग; वरिष्ठ अधिकार्‍यांची प्रत्यक्ष पाहणी; प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन

बीड : आगामी जनगणना 2027 प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यात प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षणाला वेग आला आहे. दि. 24 एप्रिल रोजी आयोजित प्रशिक्

जनगणना प्रक्रियेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा : आ.आशुतोष काळे
देवळाली प्रवरा येथे जनगणना प्रशिक्षण कार्यक्रम; अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांचे मार्गदर्शन; पारदर्शी काम करण्याच्या सूचना 
खा.अशोक चव्हाण यांनी केली स्वगणना; नागरिकांना सहभागाचे आवाहन

बीड : आगामी जनगणना 2027 प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यात प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षणाला वेग आला आहे. दि. 24 एप्रिल रोजी आयोजित प्रशिक्षण सत्राला वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली तसेच प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
नगर रोड परिसरातील प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या सत्रात निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी शिवकुमार स्वामी तसेच उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा जनगणना अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणाची प्रगती तपासली. यावेळी त्यांनी वर्गात प्रत्यक्ष बसून प्रशिक्षणाची पद्धत, विषय मांडणी आणि प्रात्यक्षिकांचा आढावा घेतला. प्रशिक्षण अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात सुरू असून प्रगणक व पर्यवेक्षक एकाग्रतेने मार्गदर्शन ऐकत असल्याचे चित्र दिसून आले. डिजिटल सादरीकरण, फळ्यावरचे प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष संवाद या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणार्थींनी विविध प्रश्न विचारत सक्रिय सहभागही नोंदवला. यावेळी मार्गदर्शन करताना शिवकुमार स्वामी म्हणाले, जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. प्रत्येक प्रगणकाने आपली जबाबदारी ओळखून अचूक व पारदर्शक माहिती संकलित करावी. नागरिकांशी विश्वासपूर्वक संवाद साधणे ही यशस्वी जनगणनेची गुरुकिल्ली आहे. तर शैलेश सूर्यवंशी यांनी सांगितले, प्रशिक्षण काळात प्रत्येक बाब सखोल समजून घेणे आवश्यक आहे. जनगणना ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून प्रशासनाच्या नियोजनाचा पाया आहे. त्यामुळे अचूकता, वेळेचे नियोजन आणि डिजिटल साधनांचा योग्य वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रशिक्षणामध्ये घरांची माहिती, कुटुंब रचना, मूलभूत सुविधा, तांत्रिक साधनांचा वापर तसेच डिजिटल पद्धतीने माहिती नोंदविणे या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रत्यक्ष उदाहरणे व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली जात आहे. एकूणच, बीड जिल्ह्यात जनगणना 2027 साठी प्रशासनाने भक्कम तयारी केली असून प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रगणक व पर्यवेक्षक सक्षम बनवले जात आहेत. यामुळे आगामी जनगणना अधिक प्रभावी, अचूक आणि पारदर्शक होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

COMMENTS