Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोरोबानगरच्या पाण्याच्या टाकीची चाचणी घ्या : लहिरे

कोपरगाव  : ज्याप्रमाणे कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर आणि मोहिनीराजनगर येथील पाण्याच्या टाकीची चाचणी घेण्यात आली त्याप्रमाणे कोपरगाव शहराच्या गोरोबानगर मधील पाण्याच्या टाकीची देखील चाचणी लवकरात लवकर करून घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांना नियमितपणे पाणी मिळावे यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलावाची निर्मिती करून ९५ किलोमीटरच्या वितरण व्यवस्थेचे व पाण्याच्या टाक्यांचे काम अंतिम टप्यात आले असून कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर आणि मोहिनीराजनगर येथील पाण्याच्या टाकीची चाचणी घेण्यात आली असून या दोन्ही टाक्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. त्याप्रमाणे गोरोबानगर मधील पाण्याच्या टाकीचे देखील काम पूर्ण झाले असून नागरीकांना नियमितपणे पाणी पुरवठा होण्यासाठी गोरोबानगर येथील पाण्याच्या टाकीची चाचणी घ्यावी. कोपरगाव शहराचा पुढील ५० वर्ष पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही ही दूरदृष्टी ठेवून आ. काळे यांनी कोपरगाव शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेवून नियोजन केलेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाणी योजनेच्या वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण करून कोपरगावकरांना पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करावा अशी मागणी नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी केली आहे. 

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल  
शेतीपंपाच्या वीजबिलावरील व्याज माफीची मागणी; उर्वरित थकबाकीवर ५० टक्के सवलत द्यावी; डॉ. पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
कवी, लेखक, लोककलावंत हे समाजभक्ती व नीतीशक्ती वाढविणारे घटक; डॉ. बाबुराव उपाध्ये : श्रीरामपुरात लोककला कलावंत साहित्यिक परिषदेचे कविसंमेलन उत्साहात

कोपरगाव  : ज्याप्रमाणे कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर आणि मोहिनीराजनगर येथील पाण्याच्या टाकीची चाचणी घेण्यात आली त्याप्रमाणे कोपरगाव शहराच्या गोरोबानगर मधील पाण्याच्या टाकीची देखील चाचणी लवकरात लवकर करून घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.

कोपरगाव शहरातील नागरिकांना नियमितपणे पाणी मिळावे यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलावाची निर्मिती करून ९५ किलोमीटरच्या वितरण व्यवस्थेचे व पाण्याच्या टाक्यांचे काम अंतिम टप्यात आले असून कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर आणि मोहिनीराजनगर येथील पाण्याच्या टाकीची चाचणी घेण्यात आली असून या दोन्ही टाक्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

त्याप्रमाणे गोरोबानगर मधील पाण्याच्या टाकीचे देखील काम पूर्ण झाले असून नागरीकांना नियमितपणे पाणी पुरवठा होण्यासाठी गोरोबानगर येथील पाण्याच्या टाकीची चाचणी घ्यावी. कोपरगाव शहराचा पुढील ५० वर्ष पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही ही दूरदृष्टी ठेवून आ. काळे यांनी कोपरगाव शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेवून नियोजन केलेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाणी योजनेच्या वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण करून कोपरगावकरांना पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करावा अशी मागणी नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी केली आहे. 

COMMENTS