गुलाबराव उगले यांची जेऊर हैबत्ती गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड

Homeताज्या बातम्याशहरं

गुलाबराव उगले यांची जेऊर हैबत्ती गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड

नेवासाफाटा- प्रतिनिधी  तालुक्यातील जेऊर हैबत्ती गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गुलाबरावं बबनरावं उगले  यांची  निवड करण्यात आली

सुरक्षित दिवाळी साजरी करा… महावितरणचे आवाहन
 कोपरगावात कोरडा दुष्काळ जाहीर करा ः आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी
मृत्यू दाखला हवाय…द्या रोख 600 रुपये ; प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा नगरमध्ये आणखी एक प्रकार

नेवासाफाटा- प्रतिनिधी 

तालुक्यातील जेऊर हैबत्ती गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गुलाबरावं बबनरावं उगले  यांची  निवड करण्यात आली आहे

जेऊर हैबत्ती ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच पार पडली. 

यावेळी ग्रामसभा अध्यक्ष  गोरक्षनाथ कानडे, सरपंच महेशराजे म्हस्के , ग्रामसेवक मासाळ एस टी, तलाठी दराडे भाऊसाहेब, कृषी सह्यायक बर्डे साहेब , आरोग्य सल्लागार डॉ थोरात ,पशुसंवर्धन गायकवाड साहेब ,उपस्थित होते यावेळी सर्वानुमते या सभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गुलाबराव उगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

गुलाबरावं उगले हे नामदार शंकरराव गडाख यांचे समर्थक असून गेली अनेक वर्षे राजकीय व सामाजिक कार्यात  सहभागी असून गावच्या प्रत्येक विकास काम असो किंवा अन्य प्रत्येक गावच्या प्रत्येक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आणि म्हणूनच त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन गावच्या वतीने गुलाबरावं उगले

 यांची  तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडी मुळे तंटामुक्ती अध्यक्ष पदी योग्य माणूस बसल्यामुळे ग्रामस्थां मधून बोले जात आहे व सर्वत्र त्यांच्या निवड्डी बद्दल अभिनंदन होत आहे 

उगले यांच्या निवडी बद्दल ग्रामपंचायत सदस्य महेश भैय्या उगले , शरद शिंदे , अजय रोंधे, कैलास म्हस्के, शरद जाधव , आप्पासाहेब सरोदे, भानुदास रटकर, सुरेश मिसाळ, अशोक मिसाळ, यांच्या सह कोतवाल,  गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS