Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दक्षिणकाशी पुणतांबा तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी द्या ; माजी आ. कोल्हे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

कोपरगाव : विधानसभा मतदारसंघातील पुणतांबा हे ‘दक्षिणकाशी’ म्हणून ओळखले जाणारे धार्मिक व ऐतिहासिक तीर्थक्षेत्र असून येथील श्री योगीराज चांगदेव महाराज व कार्तिक स्वामी महाराज मंदिर परिसराच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच गोदावरी नदीवरील घाटांची पुनर्बांधणी करून भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. माजी आ. कोल्हे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्याला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला असून येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत. कोपरगाव मतदारसंघातील पुणतांबा गावाला ‘दक्षिणकाशी’ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी राज्यभरातून हजारो भाविक श्री चांगदेव महाराज समाधी, श्री कार्तिक स्वामी मंदिर तसेच गोदावरी नदीकाठी असलेल्या अहिल्यादेवी होळकर घाट, विठ्ठल घाट आणि ब्राह्मण घाट येथे दर्शनासाठी येत असतात. सन २०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार असून त्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक येणार आहेत. त्यामुळे पुणतांबा येथेही भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर घाटांची पुनर्बांधणी तसेच मूलभूत सुविधांचा विकास तातडीने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पुणतांबा हे धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारे गाव असून येथे शेकडो वर्षांपूर्वीची अनेक पुरातन मंदिरे आहेत. या धार्मिक स्थळांचा परिसर अधिक विकसित आणि आकर्षक व्हावा, यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. योगीराज चांगदेव महाराज व कार्तिकस्वामी महाराज मंदिर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास, गोदावरी नदीवरील घाट पुनर्बांधणी तसेच भाविकांसाठी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना द्याव्यात, अशी मागणी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

दुर्गादेवी नय्यर विद्यालयात गुणगौरव सोहळा उत्साहात; मंथन व स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेत विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी
अवघ्या सहाव्या वर्षी ‘केदारकंठ’ सर ! अकोलेच्या मणिकर्णिकाचा राष्ट्रीय विक्रम; जिद्दीने हिमालयालाही गवसणी
खरातला आज न्यायालयात करणार हजर; महिलांना गर्भधारणा टाळण्यासाठी औषधांचा वापर केल्याचा संशय

कोपरगाव : विधानसभा मतदारसंघातील पुणतांबा हे ‘दक्षिणकाशी’ म्हणून ओळखले जाणारे धार्मिक व ऐतिहासिक तीर्थक्षेत्र असून येथील श्री योगीराज चांगदेव महाराज व कार्तिक स्वामी महाराज मंदिर परिसराच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

तसेच गोदावरी नदीवरील घाटांची पुनर्बांधणी करून भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

माजी आ. कोल्हे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्याला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला असून येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत. कोपरगाव मतदारसंघातील पुणतांबा गावाला ‘दक्षिणकाशी’ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी राज्यभरातून हजारो भाविक श्री चांगदेव महाराज समाधी, श्री कार्तिक स्वामी मंदिर तसेच गोदावरी नदीकाठी असलेल्या अहिल्यादेवी होळकर घाट, विठ्ठल घाट आणि ब्राह्मण घाट येथे दर्शनासाठी येत असतात.

सन २०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार असून त्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक येणार आहेत. त्यामुळे पुणतांबा येथेही भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर घाटांची पुनर्बांधणी तसेच मूलभूत सुविधांचा विकास तातडीने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पुणतांबा हे धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारे गाव असून येथे शेकडो वर्षांपूर्वीची अनेक पुरातन मंदिरे आहेत. या धार्मिक स्थळांचा परिसर अधिक विकसित आणि आकर्षक व्हावा, यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

योगीराज चांगदेव महाराज व कार्तिकस्वामी महाराज मंदिर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास, गोदावरी नदीवरील घाट पुनर्बांधणी तसेच भाविकांसाठी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना द्याव्यात, अशी मागणी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

COMMENTS