लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथे प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी विद्यार्थी वेदांत बोरावके

लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथे
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी विद्यार्थी वेदांत बोरावके यांना अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) कडून सायबर सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे.
प्रवरा रुरल इंजीनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी वेदांत बोरवके यांने नासाच्या व्हल्नरॅबिलिटी डिस्कॉलर डिसक्लोजर प्रोग्राम अंतर्गत सुरक्षा त्रुटी शोधून त्याबाबत जबाबदारीने अहवाल सादर केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत नासाकडून त्यांना विशेष गौरवपत्र प्रदान करण्यात आले. तसेच वेदांत यांनी नोकिया तसेच इतर नामांकित संस्थांच्या सुरक्षा संशोधनामध्येही मोलाचे योगदान दिले आहे. सायबर सुरक्षा क्षेत्रातील त्यांच्या संशोधनामुळे आणि उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयासह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.
संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.सुस्मिता विखे पाटील यांच्या हस्ते वेदांत बोरावके यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी डाॅ.विखे पाटील म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात प्राविण्य मिळविणे ही अभिमानाची बाब आहे. वेदांतचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.”
इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सीमा लव्हाटे व सर्व प्राध्यापक यांनीही वेदांत यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS