Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव तालुक्याच्या गोळेगाव महिला सक्षमीकरणासाठी बैठक

https://www.youtube.com/watch?v=8hb0XKJew_o उत्पादन वाढविण्याच्या स्पर्धेत रासायनिक खतांचा अतिरेक होत असून त्याचा थेट परिणाम अन्नाच्या गुणवत

भोंदूगिरीचा ‘दत्तधाम’ पॅटर्न फसला! वडगावपान येथे पोलिसांची मोठी कारवाई; अंनिसने उघड केला फसवणुकीचा..
के.बी.रोहमारे महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
अहिल्यानगरमध्ये काळाचा घाला! तपोवन रोडवर भरधाव डंपरने वयोवृद्ध महिलेला चिरडले; अपघातात जागीच मृत्यू

उत्पादन वाढविण्याच्या स्पर्धेत रासायनिक खतांचा अतिरेक होत असून त्याचा थेट परिणाम अन्नाच्या गुणवत्तेवर आणि आरोग्यावर होत असल्याने महिला बचत गटांनी जैविक गटशेतीचा स्वीकार करून निरोगी समाज घडविण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन शेवगाव पंचायत समितीच्या लाडजळगाव क्लस्टरच्या समन्वयक रूपाली झारगड यांनी केले.

शेवगाव तालुक्याच्या गोळेगाव येथे ग्रामपंचायतीच्या सरपंच मुक्ताबाई आंधळे, झाड फाउंडेशनचे अध्यक्ष संजय आंधळे, सुरेश फुंदे तसेच विविध महिला बचत गटांच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात तालुका अभियान व्यवस्थापक फिरोज सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटांच्या बैठकीचे आयोजन करून लाडजळगाव क्लस्टर अंतर्गत २८ ग्रामपंचायती व ३४ गावांचा समावेश असून एकूण ४१७ महिला बचत गट कार्यरत आहेत. तर गोळेगावामध्ये १० बचत गट सक्रिय असून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांना या बैठकीत झारगड यांनी गटशेतीची प्रभावी अंमलबजावणी, जैविक खतांचा व औषधांचा योग्य वापर, तसेच कमी खर्चात अधिक गुणवत्तापूर्ण उत्पादन कसे घेता येईल याबरोबरच महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शासनांच्या वेगवेगळ्या योजनाचा घेण्याचे आवाहन करत सविस्तर मार्गदर्शन केले

COMMENTS