मुलायमसिंह यादव : सामाजिक चळवळीतून राजकीय सत्ता!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

मुलायमसिंह यादव : सामाजिक चळवळीतून राजकीय सत्ता!

   भारतीय राजकारणात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे मुलायमसिंह यादव यांचा राजकीय उदय ६० च्या दशकातच राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी

अंगणवाडी शिक्षिका : आंदोलन आणि प्रश्न !
जगात भारत अव्वल !
नलिनीची मुक्तता आणि परिणाम! 

   भारतीय राजकारणात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे मुलायमसिंह यादव यांचा राजकीय उदय ६० च्या दशकातच राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी म्हणून झाला. सन १९६७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले मुलायमसिंह यादव यांनी विधानसभा आणि लोकसभा मिळून एकूण पंधरा वेळा प्रतिनिधित्व केले; ज्यात आठ वेळा उत्तर प्रदेश विधानसभा आणि सात वेळा लोकसभा प्रतिनिधित्व त्यांनी केले. ५ डिसेंबर १९८९ ला उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी काॅंग्रेसला पुन्हा कधीच उत्तर प्रदेशात सत्तेत येऊ दिले नाही. उत्तर प्रदेशात काॅंग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे मुलायमसिंह यांनी लोहीयांच्या ” सांसोपा ने बांधी गाठ, पिछडा पावे सौ में साठ ” या घोषणेला यथार्थपणे व्यवहारात आणण्याचा निश्चय त्यांनी केला होता. त्याच राजकीय रणनितीला त्यांनी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविला. समाजवादी म्हणून त्या त्या काळात जे राजकीय पक्ष अथवा आघाड्या उभ्या राहिल्या त्यांच्या सोबत मुलायमसिंह कायम राहिले, त्यांचा समाजवादी पक्ष १९९२ ला स्थापन होईपर्यंत. मुलायमसिंह यादव यांची राजकीय लढाई ही सामाजिक आधार घेऊन उभी राहीलेली होती. त्यामुळे, त्यांचे राजकारण एका बाजूला उच्चजातीय राजकारणाला शह देतानाच राज्याच्या लोकसंख्येत अवघे आठ टक्के असणाऱ्या यादवांना त्यांनी उत्तर प्रदेश ची रूलिंग कास्ट म्हणून उभे केले. मंडल मसिहा ठरलेल्या व्ही. पी. सिंग यांच्या उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांच्यावर मुलायमसिंह यांनी चंबळ खोऱ्यातील ४१८ डाकूंचे बनावट एन्काऊंटर केल्याचा आरोप केला होता. असा आरोप करताना त्यांनी सप्रमाण काही गोष्टी समोर आणल्या होत्या. चंबळ खोऱ्यातील डाकूंच्या एकूण तीन पोळ्या असल्याचे सांगत त्यांनी ठाकूर, मल्लाह आणि यादव अशा तीन टोळ्यांपैकी ठाकूर या राजपूत डाकूंच्या टोळ्या सोडून त्यांनी मल्लाह आणि यादव यांच्या टोळ्यांना पोलिसांकरवी बनावट एन्काऊंटर करून मारले होते, असा त्यांचा आरोप होता. व्ही. पी. सिंग यांच्या या राजकारणाची तिडीक त्यांच्या डोक्यात एवढी होती की, व्ही. पी. सिंग सरकारचा पाठिंबा मंडल-कमंडल प्रश्नावर भाजपने काढून घेतल्यानंतर, काॅंग्रेसच्या मदतीने पंतप्रधान बनलेल्या चंद्रशेखर यांना त्यांनी साथ दिली. अर्थात, त्यातून त्यांनी उत्तर प्रदेशात त्यांचे सरकार देखील वाचवले होते. राजकीय चढ‌उतार अनुभवणारे मुलायम हे कसलेले संघटक नेता होते. म्हणूनच त्यांना उत्तर प्रदेशात ” नेताजी ” या उपाधीने ओळखले जायचे. मुलायमसिंह यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळात बाबरी मशिदीवर चाल करून गेलेल्या कार-सेवकांवर फायरिंग करण्याचे आदेश दिले होते. ज्यामुळे त्यांना त्यांचे समर्थक, ” नाम मुलायमसिंह है, पर काम लोहासिंह है ” अशी घोषणा दिली होती, तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र संघटनांनी  ” मुल्ला मुलायमसिंह, ” असे त्यांना उपरोधाने म्हटले. मुलायमसिंह यांच्या राजकारणानेच काॅंग्रेस पक्षाला उत्तर प्रदेशातून सत्तास्थानातून उखडून फेकले. १९८९ नंतर उत्तर प्रदेशात काॅंग्रेस सत्तेच्या जवळपासही फिरकू शकली नाही. अर्थात, १९९२ मध्ये समाजवादी पार्टीची स्थापना करणाऱ्या मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद तीन वेळा भूषवले; परंतु, पाच वर्षाची टर्म त्यांना पूर्ण करता आली नाही. याचे कारण त्या राज्यात सामाजिक पातळीवर आलेली राजकीय जागृती हेच आहे. चळवळ किंवा आंदोलनातून आलेल्या मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेशातच नव्हे, तर, एकूणच राष्ट्रीय राजकारणात आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवला आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. अशा या द्रष्ट्या नेत्याला अभिवादन!

COMMENTS