Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंजूर कामे दर्जेदार करण्यासाठी माजी खा.तनपुरे यांनी केल्या ठेकेदारांना सूचना

राहुरी/प्रतिनिधीः ताहाराबाद येथील विकासकामांसाठी नेहमीच तनपुरे कुटुंब प्रयत्नशील असून, सदरील मंजूर झालेली कामे दर्जेदार करण्यासाठी माजी खासदार प

घरगुती वादातून मुलाने केला आजोबांच्या मदतीने बापाचा खून
वीजबिलांचे दरमहा १० हजारांवर ग्राहकांचे ‘चेक बाऊन्स’
कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्याकडून घडले माणुसकीचे दर्शन

राहुरी/प्रतिनिधीः ताहाराबाद येथील विकासकामांसाठी नेहमीच तनपुरे कुटुंब प्रयत्नशील असून, सदरील मंजूर झालेली कामे दर्जेदार करण्यासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी ठेकेदारांना सूचित केले. ताहाराबाद येथील गेल्या 30 वर्षांपासून भैरवनाथ मंदिराच्या सभागृहाचे कामाची ग्रामस्थांची आमदार प्राजक्त तनपुरे यांचेकडे केली होती. त्याबाबत निवडणुकीत दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला. प्रलंबित मागणी असलेले संत महीपती महाराज मंदिर ते वरशिंदे फाटा रस्त्याचे खडीकरण 25 लाख व ताहाराबाद बेलकरवाडी फाटा ते बेलकरवाडी रस्त्याचे खडीकरण (सीडी वर्क ) या तिन्ही कामांचा शुभारंभ माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी ताहाराबादचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताहाराबाद येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून येथील प्रसिद्ध असलेल्या भैरवनाथ मंदिरासमोर सभागृह बांधण्यात यावे. अशी मागणी सातत्याने करीत होते. त्यात ग्रामस्थांच्या मागणीला यश आले नाही. पण मागील विधानसभा निवडणुकीत आ.प्राजक्त तनपुरे यांनी सभागृहाचे काम निश्‍चित पूर्ण करण्याचे आश्‍वासन ग्रामस्थांना दिले होते. मागील वर्षीच्या कामाच्या नियोजनात या कामाचा समावेश करून सदर कामासाठी 2515 या शीर्षकांखाली 15 लाख रुपये मंजूर केले होते.ते काम मंजुरीसाठी शासनाकडे गेले असता, राज्यातील महायुतीच्या सरकारने सत्तेवर येताच या कामाना स्थगिती दिल्याने हे काम सुरु होण्यास विलंब लागला होता. या कामाबरोबर ताहाराबाद येथील संत महीपती महाराज मंदिर ते वरशिंदे फाटा रस्त्याचे खडीकरणाचे काम 25 लाख व ताहाराबाद बेलकरवाडी फाटा ते बेलकरवाडी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबीत होते .

सदरील रस्ता हा दळणवळणाचे दृष्टीने होणे अतिशय गरजेचे असल्याने सदर कामाचा 2515 मध्ये समावेश करून त्या कामासाठी 25 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. सदरची तिन्ही कामे महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामाना सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने स्थगिती दिली होती. त्यामुळे ह्या कामाना उशीर झाल्याचे सांगून सदर कामांचा शुभारंभ माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केला.त्यांनी ग्रामपंचायत्तीमध्ये निवडून आलेल्या सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व त्यांच्या कामांचे पाठपुराव्याचे कौतुक करून,ताहाराबादच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे. असे आवाहन देखील केले आहे.

COMMENTS