Homeताज्या बातम्या

एका शिक्षकाची लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या

केज शहरात वास्तव्यास असलेल्या एका शिक्षकांनी मंगळवारी रात्री केज-कळंब रोडवरील चिंचोली फाट्या नजीक एका शेतकर्‍याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफा

बीडच्या नितीन सोनवणे यांना शेगाव येथे राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार 2026 जाहीर
सारथी संस्थेच्या संशोधकांकडून किल्ले धारूर येथे स्वच्छता मोहीम
नागरिकांना दिलासा; वाहतुकीस अडथळा ठरणारी कचराकुंडी हटवलीवाहतूक शाखेच्या तत्पर कारवाईमुळे बार्शी रोडवरील कोंडी कमी



केज शहरात वास्तव्यास असलेल्या एका शिक्षकांनी मंगळवारी रात्री केज-कळंब रोडवरील चिंचोली फाट्या नजीक एका शेतकर्‍याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
प्राथमिक मिळालेल्या माहितीवरून सूर्यकांत बालासाहेब वाघमारे रा.लव्हुरी ह.मु. शाहूनगर केज वय 41 वर्षे व्यवसाय शिक्षक, सूर्यकांत वाघमारे हे केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सिद्धी विनायक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते.  मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी रात्री 11-00 वाजण्याच्या पूर्वी केज-कळंब रोडवरील चिंचोली फाट्या नजीक एका शेतकर्‍याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. परंतु आत्महत्येचे नेमके कारण काय ते अद्यापही कळाले नाही. सदर घटनेची माहिती ही केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक राजू वाघमारे व बीट अमलदार हेड कॉन्स्टेबल त्रिंबक सोपने घटनास्थळी हजर होत  पंचनामा करून मृतदेह उत्तरनीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठवण्यात आला आहे.  सदरील घटनेचा पुढील तपास हा केज पोलीस हे करत आहेत.  सूर्यकांत वाघमारे यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील, तीन भाऊ व पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. सूर्यकांत वाघमारे हे मनमिळावू व प्रेमळ स्वभावाचे होते ते शहरात व परिसरात त्यांना मानणारा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात असून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे उलखणीय कार्य असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात जनसंपर्क होता. सदर घटनेची माहिती ही केज शहरात व परिसरात कळताच सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS