Homeताज्या बातम्या

कुंडलवाडी बस स्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत;  नागरिकांची लवकर सुरू करण्याची मागणी

 कुंडलवाडी शहरातील नव्याने उभारण्यात आलेले बस स्थानक बांधकाम पूर्ण होऊन जवळपास एक  वर्षांचा कालावधी उलटून गेला असला, तरी अद्याप त्याचे उद्घाटन न

जयंती मिरवणुकीवरून वाद; तिघांना मारहाण, दोघांची प्रकृती गंभीरमाष्टी येथे घटना; 16 जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह गुन्हा, 11 जण अटकेत
कुंडलवाडीच्या भूमिपुत्राची मोठी झेप; सुदर्शन होनवडजकर मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त
कुंडलवाडीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन; शांतता राखण्याचे आवाहन



 कुंडलवाडी शहरातील नव्याने उभारण्यात आलेले बस स्थानक बांधकाम पूर्ण होऊन जवळपास एक  वर्षांचा कालावधी उलटून गेला असला, तरी अद्याप त्याचे उद्घाटन न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेली ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून, संबंधित विभागाने तातडीने बस स्थानक सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सध्या प्रवाशांना बसची प्रतीक्षा करताना उन्हाळा, पावसाळा व इतर गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. नवीन बस स्थानक कार्यान्वित झाल्यास प्रवाशांना सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध होतील. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थेलाही शिस्त लागण्यास मदत होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, बस स्थानकाचे सर्व बांधकाम पूर्ण झाले असून आवश्यक सुविधा देखील उपलब्ध आहेत. मात्र प्रशासकीय कारणांमुळे उद्घाटन रखडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रवासी व नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुंडलवाडी हे व्यापारी व शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असल्याने दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा असते. अशा परिस्थितीत नवीन बस स्थानक त्वरित सुरू करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. नागरिकांनी लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर बस स्थानकाचे उद्घाटन करून ते प्रवाशांच्या सेवेत दाखल करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

COMMENTS