Homeताज्या बातम्या

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा काँग्रेसकडून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन; माजी नगरसेवक अमर शेख यांची माहिती

बीड : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहरात विवि

राजहंस दूध संघात १३५० किलोवॅटचा भव्य सौरऊर्जा प्रकल्प; प्रतिदिन ५,२२० वीज युनिटची होणार निर्मिती – बाळासाहेब थोरात
भाळवणी ग्रामपंचायतविरोधात २० जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा; सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पट्टेकर आक्रमक
सरकारच्या उशिरा कर्जमाफीचा शेतकऱ्यांना मोठा फटका; महागडी बियाणे-खते खरेदीसाठी शेतकरी सावकारांच्या दारात
Celebrating Rahul Gandhi's birthday at Congress headquarters | Rahul Gandhi  Birthday Update; Priyanka Gandhi | Mallikarjun Kharge

बीड : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेते तथा माजी नगरसेवक अमर शेख यांनी दिली आहे. राहुल गांधी यांचा वाढदिवस दरवर्षी १९ जून रोजी देशभरात साजरा केला जातो.

या संदर्भात माहिती देताना अमर शेख म्हणाले की, देशाची लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून देशपातळीवर मोठी जनजागृती निर्माण केली आहे. त्यांच्या याच सामाजिक व राजकीय संघर्षाला अभिवादन करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम बीड शहरात राबविले जाणार आहेत.

या उपक्रमांचाच एक भाग म्हणून गुरुवारी (दि. १८ जून २०२६) सकाळी ११ वाजता बीड शहरातील वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय अन्य विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून यंदाचा वाढदिवस साजरा केला जाणार असल्याचे अमर शेख यांनी सांगितले. या उपक्रमात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS