Homeताज्या बातम्या

ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरण : शाखाधिकारी गजानन घोडके यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन; ३ जुलै रोजी पुढील सुनावणी

बीड : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या बीड येथील शिवाजीनगर शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी गजानन नारायण घोडके यांना उच्च

शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; गेवराई तालुक्यातील देवीतांडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
बीड जिल्ह्याची मान उंचावली; तवलवाडीच्या प्रशांत जगतापची मुंबईत ‘फॉरेन्सिक सायन्स’ अभ्यासक्रमासाठी निवड
स्मार्ट मीटर शंका निरसनासाठी बीड जिल्ह्यात आजपासून महावितरणचे उपविभागनिहाय ‘ग्राहक समाधान मेळावे’
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर 'ज्ञानराधा'च्या अर्चना कुटे  यांना अटक Pune Marathi News | dnyanradha multistate co operative credit  society ltd dmcsl scam case ...

बीड : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या बीड येथील शिवाजीनगर शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी गजानन नारायण घोडके यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ जुलै २०२६ रोजी होणार आहे.

आकर्षक व्याजदरांचे आमिष दाखवून लाखो ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी स्वीकारून फसवणूक केल्याच्या आरोपावरून ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे, त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड येथील शिवाजीनगर आणि बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये तत्कालीन शाखाधिकारी गजानन घोडके यांचाही समावेश आहे.

यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालय, बीड यांनी घोडके यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर त्यांनी ॲड. सुदर्शन साळुंके यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने घोडके यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला, ज्यामुळे त्यांना तपासादरम्यान तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात अर्जदाराच्या वतीने ॲड. सुदर्शन साळुंके यांनी बाजू मांडली, तर सरकार पक्षातर्फे ॲड. मुकेश गोयंका यांनी काम पाहिले. या बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील पुढील कायदेशीर घडामोडींकडे आता सर्व ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS