बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू उपशा आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन हायवा ट्रक जप्त केले असून एकूण 60.30

बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू उपशा आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन हायवा ट्रक जप्त केले असून एकूण 60.30 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ही कारवाई 10 जून 2026 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास गायकवाड जळगाव आणि मालेगाव खुर्द शिवारात गोदावरी नदीपात्र परिसरात करण्यात आली.
गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून ती हायवा वाहनांद्वारे वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती चकलांबा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ पथके तयार करून दोन स्वतंत्र ठिकाणी सापळा रचला. या कारवाईदरम्यान दोन भारत बेंझ कंपनीच्या हायवा ट्रक अवैध वाळू वाहतूक करताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही वाहने जप्त करण्यात आली असून त्यातील वाळू साठा आणि वाहने मिळून एकूण 60,30,000 चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात खालील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे : प्रदीप बंकट कदम (वय 26, रा. सुरळेगाव) रत्नेश्वर उर्फ बाळू शहादेव खेडकर (वय 33, रा. चकलांबा, ता. गेवराई, जि. बीड) तपासात असे निष्पन्न झाले आहे की, कोणताही अधिकृत परवाना नसताना केवळ आर्थिक फायद्यासाठी गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून तिची वाहतूक केली जात होती. या प्रकरणी चकलांबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 190/2026 व 191/2026 नोंदविण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहिता (इछड) कलम 303(2) अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाईमध्ये सपोनि सचिन इंगळे, पोह/बांगर, पोना/गुजर तसेच पोलीस अंमलदार मुकेश बनसोडे, रमेश बारगजे आणि हनुमान इंगोले यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतुकीवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

COMMENTS