माजलगाव: सेल्फ डिफेन्स मार्शल आर्ट्स अकॅडमी, माजलगाव यांच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या बेल्ट परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व

माजलगाव: सेल्फ डिफेन्स मार्शल आर्ट्स अकॅडमी, माजलगाव यांच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या बेल्ट परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा सोमवार, दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी संत रविदास सभागृह येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजलगावचे नगराध्यक्ष मा. बिलाल चाऊस होते. प्रमुख पाहुणे म्हणून राजेश जाधव साहेब, तर प्रमुख उपस्थितीमध्ये नगरसेवक हाजी शेख मतीन, युवा नेते सय्यद नाजेम, आकाश धुमाळे सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बेल्ट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे अब्दुल मुक्तदिर यांना मान्यवरांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवर व पालकांसमोर नानचाक्सचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन सेल्फ डिफेन्स मार्शल आर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष रेन्शी माजेद शेख सर यांनी केले होते. त्यांनी बेल्ट परीक्षेचे महत्त्व, आत्मसंरक्षणाचे कौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. भैरवी गोरे व कु. भक्ती कोल्हे यांनी केले. सेन्साई प्रेम काठोळे यांनी प्रास्ताविक केले. रेहान खान यांनी उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी व सहकार्य करणार्या सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. उत्साहपूर्ण वातावरणात हा गुणगौरव सोहळा यशस्वीपणे पार पडला.

COMMENTS