Homeताज्या बातम्या

अखेर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं! मध्यरात्रीच्या ८८ मिनिटांत ‘इन्साइड स्टोरी’; पडद्यामागे घडल्या मोठ्या हालचाली

नवी दिल्ली: तब्बल २६ दिवसांच्या दीर्घ उपोषणानंतर अखेर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री आपले उपोषण मागे घेतले आहे. केंद्रीय आरोग्य

लाठीचार्जवर ‘तातडीने’ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार! सरन्यायाधीश म्हणाले: आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ बघण्यास वेळ नाही
रस्त्यावरील कथित अतिक्रमण प्रकरण पुन्हा चर्चेत; जिल्हा परिषदेकडून चौकशीचे आदेश
घुले हत्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा; आम्ही तपासाला सहकार्य करू; खा. बजरंग सोनवणेंनी मांडली भूमिका, मुलाचे नाव जाणीवपूर्वक ओढल्याचा आरोप
Sonam Wangchuk ends indefinite hunger strike: सोनम वांगचुक यांनी २६ व्या  दिवशी उपोषण; म्हणाले, "देशात हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन घेतला निर्णय"

नवी दिल्ली: तब्बल २६ दिवसांच्या दीर्घ उपोषणानंतर अखेर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री आपले उपोषण मागे घेतले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात वांगचुक यांनी उपोषण सोडले. या घटनेनंतर जंतरमंतरवर आंदोलकांनी जल्लोष केला असला तरी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा सीजेपीने घेतला आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ४ तास उच्चस्तरीय बैठक

सोनम वांगचुक यांच्या खालावणाऱ्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यात तब्बल चार तास अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वांगचुक यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचा आणि त्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. शाह यांच्या सूचनेनंतर डॉ. जितेंद्र सिंह यांनी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांना फोन करून मागण्यांवर गंभीरपणे विचार सुरू असल्याचे सांगत उपोषण सोडण्याचे आग्रही आवाहन केले.

मध्यरात्रीच्या ‘८८ मिनिटांत’ घडलेला संपूर्ण घटनाक्रम (इन्साइड स्टोरी):

  • रात्री ११:०४ वाजता: केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयाचे शिक्षण सचिव विनीत जोशी यांची तातडीने बदली केली. त्यांच्या जागी नरेश पाल गंगवार यांची नवे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर जोशी यांना पंचायती राज मंत्रालयाचे सचिव बनवण्यात आले.
  • रात्री ११:१० वाजता: पेपर लीक प्रकरणाच्या जलद सुनावणीसाठी दिल्लीचे राऊज एव्हेन्यू कोर्ट हे ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ म्हणून अधिसूचित करण्यात आले. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयाच्या तीस हजारी कोर्टाच्या मीडिएशन सेंटरच्या इंचार्ज जस्टिस अनु ग्रोवर बालिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून राऊज एव्हेन्यू कोर्टात बदली करण्यात आली.
  • रात्री ११:५२ वाजता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांच्या नावे एक व्हिडिओ संदेश जारी केला. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडले जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास त्यांनी दिला. तसेच कॅबिनेट बैठकीत याबाबत कठोर निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
  • मध्यरात्री १२:३२ वाजता: केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांना सरकारचे लेखी आश्वासन सोपवले. अटींवर झालेली दीर्घ चर्चा आणि देशातील संभाव्य हिंसा टाळण्यासाठी उपोषण सोडत असल्याचे सांगत वांगचुक यांनी उपोषण संपवल्याची घोषणा केली.

आंदोलकांचा जल्लोष, पण आंदोलन सुरूच राहणार

वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर जंतरमंतरवरील आंदोलकांनी नाचत-गात आनंदोत्सव साजरा केला. आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी वांगचुक यांच्या निर्णयाचे स्वागत केले; मात्र “जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील आणि आम्ही जंतरमंतर सोडणार नाही,” असे स्पष्ट केले.

दरम्यान, सीजेपी (CJP) प्रतिनिधी आणि सरकार यांच्यातील पुढील संवादासाठी निष्पक्ष जागा निश्चित करण्यात आली असून, आज दुपारी १२:३० वाजता दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये अधिकृत चर्चा होणार आहे.

COMMENTS