Homeताज्या बातम्या

विद्यार्थी प्रिय ग्रंथपाल उत्तम राठोड सेवानिवृत्त; शेवटचे ग्रंथपाल ठरतील? – मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांचा प्रश्न

बीड : शहरातील नामांकित चंपावती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे विद्यार्थी प्रिय ग्रंथपाल उत्तम राठोड नियत वयोमानानुसार ३१ जुलै २०२६ रोजी सेवानिवृ

HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
के.एस.पी. विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा; बालवारकऱ्यांच्या गजराने परिसर भक्तिमय, विद्यार्थ्यांना फराळ वाटप
वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिरचा दुहेरी प्रथम क्रमांक

बीड : शहरातील नामांकित चंपावती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे विद्यार्थी प्रिय ग्रंथपाल उत्तम राठोड नियत वयोमानानुसार ३१ जुलै २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी वरील प्रश्न उपस्थित केला आहे.

शिक्षण क्षेत्रात विद्येचे मंदिर म्हटल्या जाणार्‍या शाळांतून शासन-प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक शिक्षक, कलाशिक्षक, लिपिक, शिपाई इत्यादी पदे भरली जात नाहीये. एवढेच नाही तर त्या पदावरील व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागाही भरल्या जात नाहीये. यामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक खेळ, विविध कसरती, चित्रकला सारखे पुस्तकी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गुण अवगत करता येत नाहीये.

लिपिकांच्या जागा भरल्या जात नसल्याने ते निवृत्त झाल्यानंतर त्या पदाचे काम मुख्याध्यापकाला करावे लागते तर शिपायाच्या जागी शिक्षकाला काम करावे लागत आहे. मात्र याचे कुठलेही गांभीर्य किंवा सोयरसुतक शासनकर्त्यांना नाही. आता नुकतेच चंपावती शाळेसारख्या नामांकित शाळेतील ग्रंथपाल उत्तम राठोड हे सेवानिवृत्त झाल्याने आता हे पद रिक्त झाले आहे. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे ते पुढे चालून भरले जातील याची शाश्वती नाही. म्हणून उत्तम राठोड हे शेवटचे ग्रंथपाल ठरतील काय? असा प्रश्न त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचा हृदयी सत्कार करताना मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी उपस्थित केला आहे. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS