Homeताज्या बातम्या

माथेरानला ५ एकर पार्किंग आणि नागपूरच्या क्रीडा संकुलाला ४ कोटींचा निधी; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

मुंबई: प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान येथील पार्किंगची मोठी समस्या आता सुटणार आहे. माथेरान नगरपालिकेच्या मागणीनुसार महसूल विभागाची ५ एकर ज

दिव्यांगांच्या सहाय्यक साधन वितरणासाठी अहिल्यानगरमध्ये आढावा बैठक; खासदार निलेश लंके यांचे नियोजनाचे निर्देश
कोचिंग क्लासेसच्या विळख्यात कनिष्ठ महाविद्यालये; शिक्षणाचा बाजार आणि प्रशासनाचे मौन!नामधारी कॉलेजांचा सुळसुळाट, गुणवत्तापूर्ण महाविद्यालये मात्र विद्यार्थ्यांविना; शिक्षण व्यवस्थेतील गंभीर संकटाकडे शिक्षण विभागाचे  दुर्लक्ष
पिकविमा व सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकरी हक्क मोर्चाचा संघर्ष सुरूच राहणार; म्हासापूर येथे शासन निर्णयाची होळी
ओबीसी' मंत्री आक्रमक, सरसकट कुणबी दाखले देण्यास मंत्रिमंडळ उपसमितीचा ठाम  विरोध - Marathi News | Subcommittee Meeting Obc Chandrashekhar Bawankule  Ministry Minister Aggressive Obc ...

मुंबई: प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान येथील पार्किंगची मोठी समस्या आता सुटणार आहे. माथेरान नगरपालिकेच्या मागणीनुसार महसूल विभागाची ५ एकर जागा पार्किंगसाठी मंजूर करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णयांची माहिती देताना बावनकुळे यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना अनेकदा पार्किंगच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते, या निर्णयामुळे आता पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

याशिवाय, नागपूर जिल्ह्यातील ‘गादा’ येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे क्रीडा संकुलाच्या दळणवळणात आणि क्रीडा सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असून, ग्रामीण भागातील खेळाडूंना याचा मोठा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS