Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केजमध्ये शिवसेनेच्या वतीने काँग्रेसचा जाहिर निषेध;महिला आरक्षण विधेयकाला विरोध करुन काँग्रेसने महिलांच्या हक्कांवर आघात केला-मुळूक;महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध-संगीता ठोंबरे

केज : महिलांना राजकारणात समान संधी मिळावी, त्यांचे प्रतिनिधित्व वाढावे आणि त्यांचा आवाज सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचावा यासाठी केंद्र सरकारने

काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी मोठी संधी!बीड जिल्हा पदाधिकार्‍यांच्या निवडींना वेग; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन
महामानवांच्या जयंतीनिमित्त केज बसस्थानकात ‘अक्षर’ सेवाभावी संस्थेकडून पाणपोईचे लोकार्पणपाच वर्षांची अखंड परंपरा; प्रवाशांची तहान भागवण्यासाठी स्तुत्य उपक्रम
महात्मा ज्योतिबा फुले समग्र क्रांतीचे प्रणेते-आनंद  गायकवाड

केज : महिलांना राजकारणात समान संधी मिळावी, त्यांचे प्रतिनिधित्व वाढावे आणि त्यांचा आवाज सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचावा यासाठी केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केले. मात्र काँग्रेसने विधेयकाला विरोध करुन महिलांच्या हक्कांवर आघात केला तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असल्याचे माजी आमदार संगीताताई ठोंबरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी सांगितले.
महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणार्‍या काँग्रेसचा निषेध करण्यासाठी केज येथे भवानी चौकात शनिवारी (दि.18)शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. यावेळी सचिन मुळूक यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, केंद्राच्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने याला विरोध करून महिलांच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. अशा भूमिकेला जनता कधीही स्वीकारणार नाही आणि योग्य वेळी त्यांना याचे उत्तर दिले जाईल असा इशारा मुळूक यांनी दिला. या वेळी माजी आमदार संगीता ठोंबरे यांनीही काँग्रेसच्या भूमिकेवर सडकून टीका केली. महिला आरक्षण विधेयक हे महिलांच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक असून, त्याला विरोध करणार्‍यांविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरून लढा देत राहील, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात महिला आघाडी शहर प्रमुख वैशालीताई सांगळे, शितलताई सोनवणे, मुक्ताताई गडमवार, ज्ञानेश्वरी ताई सांगळे, ज्येष्ठ शिवसैनिक अशोक जोगदंड, डॉक्टर संतोष बुडुक, तालुका सचिव विकास काशीद, उपतालुकाप्रमुख महिंद्र चाटे, उपतालुकाप्रमुख सुग्रीव बसवर, शेतकरी सेना तालुकाप्रमुख आदित्य रांजणकर, विभाग प्रमुख बाबासाहेब डोईफोडे, उपतालुकाप्रमुख योगेश देशमुख, युवा सेना उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर भांगे, संजय गायके, शिवाजी मोहिते, मोहन ढाणे, पोपट लोंढे, संदीप नाईकवाडे, महेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी काँग्रेसविरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

COMMENTS