नाळवंडी: बीड तालुक्यातील नाळवंडी येथील ग्रामपंचायत सदस्य स्व. संतोष राऊत यांचे काही दिवसांपूर्वी अकाली निधन झाल्याने वार्ड क्रमांक 3 मध्ये पोटनि

नाळवंडी: बीड तालुक्यातील नाळवंडी येथील ग्रामपंचायत सदस्य स्व. संतोष राऊत यांचे काही दिवसांपूर्वी अकाली निधन झाल्याने वार्ड क्रमांक 3 मध्ये पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या निधनामुळे नाळवंडीच्या विकासाचे अनेक स्वप्न अपूर्ण राहिले असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर, स्व. संतोष राऊत यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न त्यांच्या कुटुंबातील राघू भैय्या राऊत हे पूर्ण करतील, असा ठाम विश्वास उद्धव मेहेत्रे यांनी व्यक्त केला आहे. राघू भैय्या राऊत हे सृजनशील व दूरदृष्टी असलेले नेतृत्व असून, जनतेच्या सहमतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी निवडून आल्यानंतर नाळवंडीतील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. वार्ड क्रमांक 3 मधील सर्व मतदारांनी राघू भैय्या राऊत यांच्या ‘छत्री’ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन उद्धव मेहेत्रे यांनी केले आहे.

COMMENTS