Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भैरवनाथ नगरातील शिवमहापुराण कथेचा समारोप; काल्याच्या कीर्तनाने होणार सांगता

बीड : बहिरवाडी परिसरातील भैरवनाथ नगर येथे श्री भैरवनाथ चैत्र अष्टमी उत्सवानिमित्त सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेचा आज सोमवार, दि. 20 एप्रिल 2026 र

श्रीगोंद्यात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
“वेदांमध्ये दडलेले आहे समृद्ध जीवनपद्धतीचे ज्ञान!” – नागपुरात वेद पाठशाळेच्या उद्घाटन प्रसंगी …
श्री अगस्ति ऋषी आश्रमात कीर्तन महोत्सव 
काल भैरवनाथ मंदिर श्री क्षेत्र बहिरवाडी 🙏, #bahirwadi #newasa  #trendingreels #foryou #devgad

बीड : बहिरवाडी परिसरातील भैरवनाथ नगर येथे श्री भैरवनाथ चैत्र अष्टमी उत्सवानिमित्त सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेचा आज सोमवार, दि. 20 एप्रिल 2026 रोजी काल्याच्या कीर्तनाने समारोप होणार आहे. या कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दि. 13 एप्रिल 2026 पासून सायंकाळी 7 ते 10 या वेळेत सुरू असलेल्या या शिवमहापुराण कथेचे वाचन जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते, बालकथा सेवक, गोवत्सल ह.भ.प. प.पू. शिरीष महाराज बारी (व्यास) यांच्या हस्ते करण्यात आले. या कथेचा समारोप धारूर तालुक्यातील सोनीमोठा येथील ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोमवार, दि. 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार आहे. या संपूर्ण सप्ताहात विविध नामवंत कलाकार व कीर्तनकारांनी सेवा दिली. यामध्ये अरुण महाराज (व्हिडिओग्राफर, हिंगोली), भागवत महाराज घुगे (ऑर्गन वादक, पुणे), रोशन महाराज (तबला व ढोलक वादक), मुकेश महाराज (बँजो वादक, पुणे), भागवत बाबुळगावकर (गायनाचार्य), शिवा महाराज गिरी (पॅड वादक, शेगाव संस्थान) यांचा समावेश होता. तसेच महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य ह.भ.प. कृष्णाजी महाराज बोरखडे, गायनाचार्य ह.भ.प. ओंकार महाराज जगताप, ह.भ.प. कैलास महाराज पवार, ह.भ.प. अभिमान महाराज ढाकणे व ह.भ.प. सुग्रीव महाराज डाके यांनी कीर्तनास प्रभावी साथसंगत दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक मंडळ व स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले असून, आजच्या समारोप सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS