Homeताज्या बातम्या

पुणे विमानतळाला धमकीची चिठ्ठी; गुवाहाटीला जाणाऱ्या विमानात स्फोटक असल्याच्या उल्लेखाने खळबळ

पुणे : पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुवाहाटीकडे जाणाऱ्या प्रवासी विमानात स्फोटक असल्याची धमकी देणारी चिठ्ठी आढळल्याने काही काळ मोठी खळबळ उ

राष्ट्रवादीच्या नेत्याला रस्त्यावर केक कापणे पडले महागात; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
पुण्यात आजपासून जमावबंदी लागू; मोर्चे, आंदोलने आणि सभांवर पुढील १४ दिवस कडक निर्बंध
विवाहितेचा 8 व्या मजल्यावरून पडून मृत्यू
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं 'उड्डाण' कशामुळं रखडलं? अखेर समोर आलं  कारण… the reason behind pune airport s new terminal inauguration is still  pending

पुणे : पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुवाहाटीकडे जाणाऱ्या प्रवासी विमानात स्फोटक असल्याची धमकी देणारी चिठ्ठी आढळल्याने काही काळ मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी गुवाहाटीकडे रवाना होणाऱ्या विमानाची नियमित सुरक्षा तपासणी सुरू असताना विमानातील प्रसाधनगृहात (वॉशरुम) एक संशयास्पद चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत विमानामध्ये स्फोटक असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. ही माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या आणि विमानाची सखोल तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान विमानात कोणतीही स्फोटक सामग्री अथवा संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण विमानाची पुन्हा नव्याने तपासणी करण्यात आल्याने विमानाचे उड्डाण काही काळ विलंबाने झाले. या घटनेची माहिती विमानतळ पोलिसांना देण्यात आली असून अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची छाननी केली जात आहे.

COMMENTS