Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज उपजिल्हा रुग्णालय शस्त्रक्रियेत जिल्ह्यात अव्वल; रुग्णसेवेचा नवा उच्चांक

केज : केज येथील उपजिल्हा रुग्णालयाने आरोग्य सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दर्जेदार उपचार, सातत्यपूर्ण सेवा

मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 27 मुलींना मोफत लस
आदिवासी सेवक डॉ. पोपेरे पंजाब सरकारकडून सन्मानित 
होर्मुझमधील तणावातही ‘जग विक्रम’ भारतात; कांडला बंदरात एलपीजीसह सुरक्षित दाखल

केज : केज येथील उपजिल्हा रुग्णालयाने आरोग्य सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दर्जेदार उपचार, सातत्यपूर्ण सेवा आणि यशस्वी शस्त्रक्रियांच्या जोरावर हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी मोठा आधार ठरत आहे.
मागील वर्षभरात उपजिल्हा रुग्णालयाने एकूण 2117 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत जिल्ह्यात सर्वोच्च स्थान मिळवले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोफत आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात रुग्णालयाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रुग्णालयात जनरल सर्जरी, स्त्रीरोग, अस्थिरोग, बालरोग, नेत्रचिकित्सा तसेच भूलतज्ज्ञ अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून सतत सेवा दिली जात आहे. यामध्ये स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, गाठ काढणे, हर्निया तसेच हाडांच्या विविध शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये डॉ. दत्तात्रेय केंद्रे (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. केशव इंगोले (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. भाऊसाहेब चाळक, डॉ. स्वाती साखरे, डॉ. दिगंबर मुंडे (भूलतज्ज्ञ), डॉ. बालासाहेब सावंत (बालरोग तज्ज्ञ), डॉ. अमोल गीते (अस्थिरोग तज्ज्ञ), डॉ. श्रीकृष्ण म्हात्रे, डॉ. सुमित कुलकर्णी यांच्यासह अनेक डॉक्टर व कर्मचारी कार्यरत आहेत. रक्तपेढी, शस्त्रक्रिया विभाग, तसेच इतर सहाय्यक सेवांमध्ये श्री. श्रीकृष्ण नागरगोजे, श्री. महादेव इंगळे, श्रीमती सोनवणे, श्रीमती गवळी, परमेश्वर राऊत, अमर वाघमारे आदी कर्मचार्‍यांचेही मोठे योगदान आहे. रुग्णालयात एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन तसेच नव्याने सुरू करण्यात आलेली डायलिसिस सुविधा उपलब्ध असून, त्यामुळे मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णांना दर्जेदार आणि वेळेवर सेवा देण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने कार्यरत आहोत, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रेय केंद्रे यांनी सांगितले. या यशाबद्दल रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. केशव इंगोले व डॉ. भाऊसाहेब चाळक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मोठ्या प्रमाणात झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियांमुळे रुग्णांनीही समाधान व्यक्त केले आहे. – रुग्णसेवेत केज उपजिल्हा रुग्णालयाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.

COMMENTS