Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जि.प.के. प्रा. शाळा वांगीच्या मुख्याध्यापकांची कन्या साक्षी वीर एमबीबीएस पदवीधर; परिश्रम आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

पाली : जि.प.के. प्राथमिक शाळा वांगी येथील मुख्याध्यापक सुभाष वीर सर यांची कन्या कु. साक्षी सुभाष वीर हिने वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मानली ज

डॉ. भावना धन्वे यांचा सत्कार
शेख अजिमोद्दीन यांचा सत्कार; पद्मपाणि राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजकार्य पुरस्काराबद्दल अभिनंदन
दीपक शिंदे यांचा श्रीगोंद्यात सत्कार

पाली : जि.प.के. प्राथमिक शाळा वांगी येथील मुख्याध्यापक सुभाष वीर सर यांची कन्या कु. साक्षी सुभाष वीर हिने वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मानली जाणारी एमबीबीएस पदवी यशस्वीरीत्या संपादन करून आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे पालीसह संपूर्ण परिसरात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लहानपणापासूनच अभ्यासू, जिद्दी आणि ध्येयवेडी असलेल्या साक्षीने शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर उल्लेखनीय कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवणे हेच एक मोठे आव्हान असताना, त्यानंतरचा कठोर आणि दीर्घकालीन अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणे हे तिच्या चिकाटीचे प्रतीक ठरले आहे. दिवस-रात्र परिश्रम, वेळेचे काटेकोर नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले. साक्षीच्या या यशामागे तिच्या कुटुंबियांचे मोलाचे योगदान आहे. विशेषतः वडील सुभाष वीर सर यांचे मार्गदर्शन आणि आईचे सततचे प्रोत्साहन यामुळे तिला योग्य दिशा मिळाली. शिक्षक कुटुंबातील संस्कार आणि शिक्षणाविषयीची ओढ यामुळे साक्षीने लहानपणापासूनच आपले ध्येय निश्चित केले होते. वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर समाजातील गरजू आणि वंचित घटकांना आरोग्य सेवा देण्याचे साक्षीचे ध्येय आहे. रुग्णसेवा हीच खरी सेवा या भावनेतून ती पुढे कार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे तिने व्यक्त केले आहे. तिची जिद्द, परिश्रम आणि सेवाभाव इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहेत. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षकवर्ग, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

COMMENTS