Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोरेगावच्या बांगुर नगर परिसरात भीषण आग; झोपडपट्टीसह ४-५ दुकाने खाक

मुंबई : मुंबईतील बांगुर नगर गोरेगाव परिसरात पश्चिम मेट्रो लाईन जवळच्या आज सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. बांगुर नगर परिसरामध्ये डी मार्टच्यासम

हडपसरमध्ये सिलेंडरच्या स्फोटाने आगीचे तांडव; ५ दुकाने खाक, आगीच्या ज्वाला तिसऱ्या मजल्यापर्यंत!
भिवापुरात आगीचं भीषण तांडव! १६ घरं खाक, संसार उघड्यावर; मदतीसाठी पीडित कुटुंबांचा टाहो
इंदौरमध्ये गॅस पाइपलाइन लीक झाल्याने भीषण स्फोट; अवघ्या काही सेकंदांत संपूर्ण घर कोसळले
Fire Near Goregaon Bangur Nagar Metro: मुंबईतील बांगुर नगर गोरेगाव पश्चिम मेट्रो लाईन जवळच्या परिसरात आज आग लागल्याची घटना घडली.

मुंबई : मुंबईतील बांगुर नगर गोरेगाव परिसरात पश्चिम मेट्रो लाईन जवळच्या आज सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. बांगुर नगर परिसरामध्ये डी मार्टच्यासमोर झोपडपट्टीमध्येही आग लागल्याने मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचा चार ते पाच गाड्या दाखल होऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहे.
सुदैवाने, या आगीमध्ये अद्याप कोणतेही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीमध्ये चार ते पाच दुकान जळून खाक झाले आहेत. साधारणपणे सकाळी दहा वाजताच्या दरम्यान ही आग लागलीहोती आणि वाऱ्याच्या वेगाने वाढत गेली. मिळालेल्या माहितीनुसार सजावटीच्या सामानाला, डेकोरेशनच्या वस्तूला ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. हि आग नक्की कशामुळे लागली, या संदर्भात पुढील तपास स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

COMMENTS