अकोले : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अकोले तालुक्यातील मॉडर्न हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी पूर्वा ज्योती धनंजय जाजू हिने 87.83 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच मॉडर्न कॉलेजच्या कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांमध्येही तिने प्रथम क्रमांक मिळवून दुहेरी यश संपादन केले आहे. पूर्वा जाजू हिने वाणिज्य शाखेत तालुक्यात अव्वल येण्याचा मान मिळवला असून ती पत्रकार अजय जाजू यांची पुतणी आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, मॉडर्न हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, अकोलेचा एकूण निकाल 93.90 टक्के लागला आहे. विभागनिहाय विज्ञान शाखेचा निकाल 97.65 टक्के, वाणिज्य शाखेचा 96.15 टक्के तर कला शाखेचा 84.84 टक्के इतका आहे. विशेष म्हणजे तिन्ही शाखांमध्ये मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले. वाणिज्य शाखेत कृष्णा राजेंद्र अभंग (82.50%) याने द्वितीय, तर तृप्ती सूर्यभान गजे (82.33%) हिने तृतीय क्रमांक मिळविला. विज्ञान शाखेत गौरी विजय शेलार (82.67%) प्रथम, समीक्षा दत्तात्रय उतरडे (74.50%) द्वितीय व श्रुती भानुदास धुमाळ (73.67%) तृतीय क्रमांकावर राहिल्या. कला शाखेत प्रतीक्षा किसन मालुंजकर (74.17%) हिने प्रथम, स्वातीया रशिद तांबोळी (67.17%) हिने द्वितीय, तर सपना सोमनाथ मेंगाळ (66.83%) हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

अकोले : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अकोले तालुक्यातील मॉडर्न हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी पूर्वा ज्योती धनंजय जाजू हिने 87.83 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच मॉडर्न कॉलेजच्या कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांमध्येही तिने प्रथम क्रमांक मिळवून दुहेरी यश संपादन केले आहे.
पूर्वा जाजू हिने वाणिज्य शाखेत तालुक्यात अव्वल येण्याचा मान मिळवला असून ती पत्रकार अजय जाजू यांची पुतणी आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, मॉडर्न हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, अकोलेचा एकूण निकाल 93.90 टक्के लागला आहे. विभागनिहाय विज्ञान शाखेचा निकाल 97.65 टक्के, वाणिज्य शाखेचा 96.15 टक्के तर कला शाखेचा 84.84 टक्के इतका आहे. विशेष म्हणजे तिन्ही शाखांमध्ये मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले.
वाणिज्य शाखेत कृष्णा राजेंद्र अभंग (82.50%) याने द्वितीय, तर तृप्ती सूर्यभान गजे (82.33%) हिने तृतीय क्रमांक मिळविला. विज्ञान शाखेत गौरी विजय शेलार (82.67%) प्रथम, समीक्षा दत्तात्रय उतरडे (74.50%) द्वितीय व श्रुती भानुदास धुमाळ (73.67%) तृतीय क्रमांकावर राहिल्या.
कला शाखेत प्रतीक्षा किसन मालुंजकर (74.17%) हिने प्रथम, स्वातीया रशिद तांबोळी (67.17%) हिने द्वितीय, तर सपना सोमनाथ मेंगाळ (66.83%) हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

COMMENTS