Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रविकांत भाऊ राठोड यांना विधानपरिषदेत संधी द्यावी-योगेश पवार

गेवराई : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बंजारा समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी पुढे येत आह

उमापूर येथून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका
जि.प. शिक्षक विकास घोडके सर यांना ’प्रेरणास्तंभ’ पुरस्कार प्रदान; अमरसिंह पंडित यांच्या हस्ते गौरव
पाच हजारांची लाच घेताना ग्रामसेवक रंगेहात पकडला

गेवराई : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बंजारा समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी पुढे येत आहे. बंजारा समाजातील तरुण, तडफदार आणि कणखर नेतृत्व म्हणून ओळख असलेले रविकांत भाऊ राठोड यांना विधानपरिषद सदस्य म्हणून संधी द्यावी, असे आवाहन बंजारा बिग्रेडचे बीड जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ पवार यांनी केले आहे.
योगेश पवार म्हणाले की, मागील विधानसभा निवडणुकीत रविकांत राठोड यांनी ज्या-ज्या मतदारसंघात प्रचार केला, त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तसेच नगरपरिषद निवडणुकांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेत संघटनात्मक बळकटी वाढवली आहे. राठोड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विमुक्त जाती प्रदेशाध्यक्ष असून, राष्ट्रीय बंजारा बिग्रेड भारत या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे बंजारा समाजात मोठा विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा दमदार युवा नेत्याला विधानपरिषदेत संधी दिल्यास बंजारा समाज राष्ट्रवादी काँग्रेससोबत अधिक दृढपणे उभा राहील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

COMMENTS