Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये 1.20 कोटींच्या खडीकरण घोटाळा! मुख्याधिकार्‍यावर गुत्तेदार-अभियंत्याला वाचवण्याचा प्रयत्न; नगरपरिषद समोर जागरण गोंधळ आंदोलन लवकरच करणार-वर्षाताई जगदाळे

बीड : बीड नगरपरिषद अंतर्गत वार्ड क्रमांक 11, बालेपीर भागात झालेल्या खडीकरण कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप मनसेच्या राज्य उपाध्यक्ष वर्

क्रीडांगणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी चिकणी येथे आजपासून उपोषणचिकणी गावाला सुसज्ज व सुशोभित क्रीडांगण मिळावे यासाठी आनंद वर्पे यांचे आजपासून आमरण उपोषण
तरोडा बुद्रुकमध्ये वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा; संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकत केला तीव्र निषेध
ओव्हरलोडिंग धोकादायक; अवैध रेती वाहतूक तात्काळ बंद करा, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा

बीड : बीड नगरपरिषद अंतर्गत वार्ड क्रमांक 11, बालेपीर भागात झालेल्या खडीकरण कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप मनसेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी केला आहे. या प्रकरणात तब्बल एक कोटी वीस लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आला असून प्रत्यक्षात कामच झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक 11 मधील पाच गल्ल्यांमध्ये खडीकरणाचे काम दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता एकही खडी टाकण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात लेखी तक्रार करूनही मुख्याधिकारी शैलेश फळसे यांनी कोणतीही दखल घेतलेली नसल्याचे वर्षाताई जगदाळे यांनी म्हटले आहे. तक्रार करूनही संबंधित गुत्तेदार आणि अभियंता यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप करत, या प्रकरणात दोषी अभियंत्याला तात्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. तसेच, प्रशासनाकडून योग्य कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने नगरपरिषदेसमोर जागरण गोंधळ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वर्षाताई जगदाळे यांनी दिला आहे.बीड नगरपरिषदेत एवढ्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप होऊनही मुख्याधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने, हे आंदोलन त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठीच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS