Homeताज्या बातम्यादेश

रोजगार निर्मितीसाठी भारताला 8 टक्के वाढ आवश्यक

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे मत

नवी दिल्ली ः जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने सुरू आहे. ब्रिटन, बाझील, ज

समाजवादी आणि उध्दव ठाकरे !
मधुमेहाबाबत जागृती, शिक्षणावर भर आवश्यक – आरोग्यमंत्री राजेश टोपे
उमेदवारी अर्ज दाखल करताना घ्यावयाची दक्षता व आवश्यक तरतुदी

नवी दिल्ली ः जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने सुरू आहे. ब्रिटन, बाझील, जर्मनी, पाकिस्तान, श्रीलंका देशाच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले असतांना भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. मात्र भारताला जर अधिक रोजगार निर्मिती करायची असेल, तर 8 टक्के वाढीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले.
देशात महागाई, रोजगारासह अन्य अनेक समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जगातील अनेक उद्योग भारतात गुंतवणूक करण्यास तसेच उत्पादन करण्यास उत्सुक आहेत. या पार्श्‍वभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना रघुराम राजन म्हणाले की, चीन आणि व्हिएतनाम सारख्या उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारताला आपल्या कर्मचार्‍यांना उत्तम प्रशिक्षण देऊन सुसज्ज करावे लागेल. भारत मूल्य साखळीत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि याची काही चिन्हे दिसत आहेत. मात्र, संपूर्ण सेलफोन भारतात तयार व्हायला वेळ लागेल, असे रघुराम राजन यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आयफोनच्या पार्ट्सच्या निर्मितीचा संदर्भ दिला. भारताची सध्याची आर्थिक वाढ 6 ते 6.5 टक्क्यांनी इतर देशांच्या तुलनेत मजबूत आहे. परंतु रोजगारांच्या गरजेच्या तुलनेत असे वाटते की, हे अजूनही कमी आहे. देशाची लोकसंख्या आणि येथील रोजगाराची गरज लक्षात घेता 8 ते 8.5 टक्के आर्थिक वाढीची गरज आहे. आपणाला येथे रोजगाराच्या गरजेच्या संदर्भात बोलायचे झाल्यास ही वाढ थोडी मंद दिसते, कारण आपल्याकडे मोठ्या संख्येने तरुण आहेत, ज्यांना रोजगाराची गरज आहे, असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बेरोजगारीचा उच्चांक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही चिंतेचा विषय आहे. भारताचा जीडीपी इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत जास्त आहे, परंतु लाखो लोकांसाठी पुरेसा रोजगार निर्माण करू शकत नाही. ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर 10.05 टक्क्यांपर्यंत वाढला, जो दोन वर्षांतील सर्वोच्च आहे. कडइउ च्या अंदाजानुसार, भारताला पुढील 10 वर्षांत 7 कोटी नवीन रोजगार निर्माण करण्याची गरज आहे आणि 7.5 टक्के वाढीद्वारे केवळ दोन तृतीयांश रोजगार समस्या सोडवल्या जातील, असे एका अहवालात म्हटले आहे.

COMMENTS