नांदेड : राष्ट्रीय स्तरावरील जी-पॅट आणि गेट 2026 या प्रतिष्ठित परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्या

नांदेड : राष्ट्रीय स्तरावरील जी-पॅट आणि गेट 2026 या प्रतिष्ठित परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या औषधनिर्माणशास्त्र संकुलात विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी तब्बल 29 विद्यार्थ्यांनी या परीक्षांमध्ये यश मिळवत संस्थेचे मागील सर्व विक्रम मोडीत काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या चिकाटी, मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले. या यशामध्ये प्रज्वल हलगरे (एआयआर-475), आदित्य सोनी(एआयआर-769) आणि श्रेया मोरे (एआयआर-965)यांनी राष्ट्रीय स्तरावर उच्च स्थान पटकावत विशेष कामगिरी बजावली. जी-पॅट परीक्षेत करण गाडेकर, विश्वजित निकम, प्रिती जिलहवार, ओंकार धुळे, मंजुषा आबदार, श्रद्धा फुलझेले, महादेव अवचार, अंगद चांभारकर, पूजा जाधव, सौंदर्य भाये, राजेश गाडेकर, शशिकांत इंगोले, परमेश्वर होनशेट्टी, जीवन हागे, गौरी माके, आराधना मेश्राम, आशिष सवाणे, पप्पू मडावी, पृथ्वीराज धुमाळे, विशाल धनवे आणि साक्षी भालके यांनी यश संपादन केले. तर गेट 2026 परीक्षेत सुमित मुळीक, यज्ञेश सूर्यवंशी, सेजल देशमुख, विशाखा सुतार आणि अभिषेक चित्ते यांनी घवघवीत यश मिळवले. औषधनिर्माणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. संजय पेकमवार यांनी सांगितले की, हे यश म्हणजे संकुलातील गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच विद्यार्थ्यांनी हा मैलाचा दगड गाठला, अशी भावना व्यक्त करत आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS