Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आर टी ई प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थी पालक याना भेटून समतादूत यांच्याकडून ऍडमिट कार्डचे वाटप व मार्गदर्शन

अंबाजोगाई प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची  स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, अंतर्

जम्मू-काश्मीरमध्ये CRPF च्या वाहनावर हल्ला |
5 लाख 28 हजारांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई | LokNews24
नगर शहराचे महत्व पर्यटन विभागाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचविणार :आदिती तटकरे

अंबाजोगाई प्रतिनिधी – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची  स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, अंतर्गत सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, निबंधक अस्वार मॅडम व बार्टीचे विभाग प्रमुख सत्येद्रनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत यांच्याकडून विविध योजनेचा प्रसार व प्रचार व त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळावा यासाठी सतत कार्य सुरू असते त्या अनुषंगाने अंबाजोगाई तालुक्यामध्ये समतादूत व्यंकटेश जोशी यांच्याकडून आरटीई ची माहिती प्रसार व प्रचार करून मोफत ऑनलाईन फॉर्म भरून देण्यात आले होते.  आता निवड प्रक्रिया मध्ये निवड झालेल्या पाल्यांचे निवड पत्र पालकांना वाटप करण्याचे कार्य समतादूत करत आहे त्या अनुषंगाने अंबाजोगाई तालुक्यातील अनेक मुलांचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करून भरलेल्या फॉर्म ची व हमीपत्र तसेच डमिट कार्ड चे   वाटप करण्यात येत आहे.  तसेच प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सहकार्य करत आहेत.

COMMENTS