Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड स्कॉलर स्पर्धा परीक्षेत दुर्वा फड प्रथम

माहूर : नांदेड जिल्हा शिक्षण मंडळ आयोजित नांदेड स्कॉलर जिल्हास्तर स्पर्धा परीक्षा 2026 मध्ये माहूर तालुक्यातील पवनाळा (वरचे) येथील रहिवासी तसेच म

काँग्रेसच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील
जनआरोग्य समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविका विजया देवकर  
डॉ. शिंदे यांना ‘स्व. अण्णासाहेब देशमुख स्मृती पुरस्कार’ जाहीर
Nanded News : शिष्यवृत्ती परीक्षेत नांदेडचे यश; राज्य गुणवत्ता यादीत २५  विद्यार्थी चमकले

माहूर : नांदेड जिल्हा शिक्षण मंडळ आयोजित नांदेड स्कॉलर जिल्हास्तर स्पर्धा परीक्षा 2026 मध्ये माहूर तालुक्यातील पवनाळा (वरचे) येथील रहिवासी तसेच महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदा (ता. किनवट) येथील इयत्ता 5 वीची विद्यार्थिनी दुर्वा भागवत फड हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांमध्ये मोठी प्रतिभा दडलेली असून योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे दुर्वाने सिद्ध करून दाखवले आहे. शहरांप्रमाणे ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा कमी असल्या तरी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर विद्यार्थी यशाची शिखरे गाठू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदा येथील शिक्षकांनी मागील वर्षापासून सातत्याने अभ्यास घडवून आणत वेळोवेळी मार्गदर्शन केले, याचा मोठा फायदा दुर्वाला झाला. दुर्वा फड हिच्या या यशाबद्दल नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे तसेच किनवट गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला. या यशाबद्दल संस्थेचे सचिव प्रशांत ठमके, मुख्याध्यापक पी. जी. मुनेश्वर, उपमुख्याध्यापक के. जी. डांगे, पर्यवेक्षक एम. एम. भोयर, एम. पी. मुनेश्वर तसेच इतर शिक्षक व ग्रामस्थांनी दुर्वाचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS