Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनीच्या आठ विद्यार्थ्यांना तैवानमध्ये इंटर्नशिपची संधी

कोपरगाव : संजीवनी युनिव्हर्सिटी, संजीवनी फार्मसी महाविद्यालय आणि संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील एकूण आठ विद्यार्थ्यांची तैवानमधील विविध विद्यापीठांमध्ये ४ ते ६ महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठांकडून शिष्यवृत्तीही देण्यात आली असून संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या पुढाकारातून ही संधी उपलब्ध झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संजीवनी युनिव्हर्सिटीच्या कल्याणी रामदास पोपळघट व संकेत सुनील गायकवाड, संजीवनी फार्मसी महाविद्यालयाचे प्रथमेश राजेंद्र अंब्रे, श्रावणी संजय खडांगळे, गायत्री आप्पासाहेब वक्ते व पुष्कर दीपक मुथ्था तसेच संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे युवराज विजय राजुरे व अंजली चंद्रभान सोनवणे यांचा समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्हाईस चान्सलर डॉ. ए. जी. ठाकुर, डॉ. आर. एस. शेंडगे, डॉ. आर. ए. कापगते, डॉ. विपुल पटेल, डॉ. कविता राणी, डॉ. माधुरी जावळे, डॉ. महेंद्र गवळी व प्रा. प्रेरणा जाधव उपस्थित होते. संजीवनीच्या अनेक विद्यार्थ्यांना आजवर विविध देशांत शिष्यवृत्तीसह इंटर्नशिपची संधी मिळाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा बायोडेटा अधिक सक्षम होत असून ते जागतिक स्पर्धेत आत्मविश्वासाने उभे राहत आहेत. या अनुभवाच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढे एमएससारख्या उच्च शिक्षणाच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. तसेच परदेशातील अनुभवांच्या आधारे संस्थेच्या अभ्यासक्रमात आवश्यक बदल सुचविणेही शक्य होते –  अमित कोल्हे, प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी

संजीवनी इंजिनिअरिंगच्या सात विद्यार्थ्यांना नोकरी 
‘जीपॅट’ स्पर्धेत संजीवनी बी. फार्मसीचे यश 
बातमीत इंग्रजी शब्द आहेत; संजीवनी इंजिनिअरिंगच्या आठ विद्यार्थ्यांना नोकरी 
संजीवनीच्या ८ विद्यार्थ्यांची तैवान मधील विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपसाठी  निवड – Om Sai News

कोपरगाव : संजीवनी युनिव्हर्सिटी, संजीवनी फार्मसी महाविद्यालय आणि संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील एकूण आठ विद्यार्थ्यांची तैवानमधील विविध विद्यापीठांमध्ये ४ ते ६ महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठांकडून शिष्यवृत्तीही देण्यात आली असून संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या पुढाकारातून ही संधी उपलब्ध झाली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संजीवनी युनिव्हर्सिटीच्या कल्याणी रामदास पोपळघट व संकेत सुनील गायकवाड, संजीवनी फार्मसी महाविद्यालयाचे प्रथमेश राजेंद्र अंब्रे, श्रावणी संजय खडांगळे, गायत्री आप्पासाहेब वक्ते व पुष्कर दीपक मुथ्था तसेच संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे युवराज विजय राजुरे व अंजली चंद्रभान सोनवणे यांचा समावेश आहे.

संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्हाईस चान्सलर डॉ. ए. जी. ठाकुर, डॉ. आर. एस. शेंडगे, डॉ. आर. ए. कापगते, डॉ. विपुल पटेल, डॉ. कविता राणी, डॉ. माधुरी जावळे, डॉ. महेंद्र गवळी व प्रा. प्रेरणा जाधव उपस्थित होते.

संजीवनीच्या अनेक विद्यार्थ्यांना आजवर विविध देशांत शिष्यवृत्तीसह इंटर्नशिपची संधी मिळाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा बायोडेटा अधिक सक्षम होत असून ते जागतिक स्पर्धेत आत्मविश्वासाने उभे राहत आहेत. या अनुभवाच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढे एमएससारख्या उच्च शिक्षणाच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. तसेच परदेशातील अनुभवांच्या आधारे संस्थेच्या अभ्यासक्रमात आवश्यक बदल सुचविणेही शक्य होते –  अमित कोल्हे, प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी

COMMENTS