Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बँकेच्या संचालक पदासाठी सचिन मगरे-पाटील यांचा ठराव मंजूर

नांदेड : मुदखेड तालुक्यातून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी सचिन मगरे-पाटील यांचा ठराव सर्व समितीने एकमताने मंजूर केला आहे

धीरज बोर्डेचे ‘सिडको’ च्या परीक्षेत यश  
डॉ. भावना धन्वे यांचा सत्कार
पोलिस पाटील संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी कृष्णा कदम यांची निवडसर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

नांदेड : मुदखेड तालुक्यातून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी सचिन मगरे-पाटील यांचा ठराव सर्व समितीने एकमताने मंजूर केला आहे. त्यामुळे ते बँकेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीत समाविष्ट होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
शेतीनिष्ठ शेतकरी व युवा नेते म्हणून ओळख असलेल्या सचिन मगरे-पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सेवासहकारी सोसायटी पिंपळ कौठा (मगरे)च्या संचालक मंडळाने बँक निवडणूक प्रक्रियेत मतदार म्हणून तसेच तालुका संचालक पदासाठी सर्वसंमतीने ठराव मंजूर केला. या निर्णयानंतर विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकरराव मगरे यांचे पुत्र असलेल्या सचिन मगरे-पाटील यांना कृषी, शिक्षण व सहकार क्षेत्रातील अनुभवाचा मोठा वारसा लाभला आहे. त्यांच्या कुटुंबाचीही सामाजिक व राजकीय क्षेत्रात भक्कम पार्श्वभूमी आहे. गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायतीची धुरा त्यांचे बंधू बाळासाहेब मगरे सांभाळत असून, तर संतोष मगरे-पाटील हे गेल्या दहा वर्षांपासून सोसायटीचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. दोन पिढ्यांपासून असलेल्या राजकीय वारशामुळे सचिन मगरे-पाटील यांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्राचा दांडगा अनुभव मिळाला आहे. त्यांचे आजोबा मुदखेड नगर परिषदेत उपाध्यक्ष पदावर दीर्घकाळ कार्यरत होते. माजी मुख्यमंत्री तथा खासदारअशोकराव चव्हाण यांचे ते एकनिष्ठ समर्थक मानले जातात. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर अभ्यासू भूमिका घेणारे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी त्यांची निवड निश्चित मानली जात असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS