Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडकरांना वेळेत मूलभूत सुविधा द्या; कामचुकार अधिकार्‍यांवर कठोर कारवाई; आ. बोंढारकरांचा मनपा प्रशासनाला इशारा

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना पाणी, वीज, रस्ते, ड्रेनेज यांसह सर्व मूलभूत सुविधा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने उप

कोट्यवधींची ‘केमिकल’ डागडुजी फेल; जिल्हा परिषद इमारत मृत्यूच्या उंबरठ्यावर!भेगांनी पोखरलेल्या इमारतीत कर्मचारी कामावर; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप
अवकाळी पावसाने नांदेड शहराला झोडपले; रस्ते जलमय, होर्डिंग्ज कोसळली, वीजपुरवठा खंडित
उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर खाजगी क्लासेससाठी आदेश निर्गमित; सकाळ-सायंकाळ सत्र किंवा ऑनलाईन माध्यमातूनच वर्ग घेण्याचे निर्देश

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना पाणी, वीज, रस्ते, ड्रेनेज यांसह सर्व मूलभूत सुविधा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. या कामात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, कामचुकारपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट आणि कडक इशारा आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी दिला.
महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित सर्व विभागांच्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली. शहरातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करत त्यांनी प्रत्येक विभागाला ठोस जबाबदार्‍या सोपवल्या. पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, ड्रेनेज लाईन, रस्ते, नाल्यांची स्वच्छता, घरकुल योजना, पिण्याच्या पाण्याचे नियोजन तसेच आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला. शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत; मात्र ते वेळेत दुरुस्त न झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या उघड्या व खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांना जखमी व्हावे लागत आहे. ही बाब गंभीर असल्याचे नमूद करत संबंधित विभागांनी तातडीने कामे पूर्ण करून रस्ते वाहतुकीस योग्य करावेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या तापमानामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या तीव्र होत चालली आहे. काही भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याची दखल घेत आ. बोंढारकर यांनी पाणीपुरवठा विभागाला कठोर निर्देश देत, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी तातडीने नियोजन करावे, असे सांगितले. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा वाढवण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. तसेच, महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारींकडे काही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली. यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, तक्रार घेऊन येणार्‍या नागरिकांची समस्या त्याच दिवशी सोडवावी, कोणालाही वारंवार फेर्‍या माराव्या लागू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांच्या कामात विलंब करणार्‍या किंवा दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची सफाई, पाणी साचू नये यासाठी आवश्यक उपाययोजना, तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देत त्यांनी शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आतापासूनच तयारी करण्याचे आदेश दिले. या बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त निलेश सुनकेवार, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, उपायुक्त नितीन गाढवे, शिवसेना जिल्हाप्रमुख विनय  गिरडे, शहरप्रमुख तुलजेश यादव, सुहास खराणे , शहर अभियंता सुमंत पाटील, सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, विद्युत विभागाचे उपअभियंता सतीश ढवळे, घरकुल विभाग प्रमुख प्रकाश कांबळे, एमएसईबीचे कार्यकारी अभियंता स. न. कांबळे, तसेच इतवारा व वजीराबाद विभागांचे क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य व अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि इतर सर्व विभागांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत आ. बोंढारकर यांनी प्रशासनाने नागरिकाभिमुख दृष्टिकोन ठेवून काम करण्याचे आवाहन केले आणि नांदेड शहराचा विकास हा केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात दिसला पाहिजे, असे ठाम मत व्यक्त केले.

COMMENTS