स्वपक्षीय राजकारण : अंतर्विरोध आणि स्पर्धा!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

स्वपक्षीय राजकारण : अंतर्विरोध आणि स्पर्धा!

    महाविकास आघाडी सरकार जाऊन आज चार दिवस तर, नवे सरकार स्थापन होऊन तीन दिवस पूर्ण होत असताना काही संवैधानिक बाबींची पूर्तता करावयाची असताना, मात्र,

गप्पा मारत मैत्रिणी निघाल्या अन् भरधाव वेगाने एकीला कारने उडवलं | LOK News 24
राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा
राज्यात भाजपविरोधात असंतोष ः शरद पवार

    महाविकास आघाडी सरकार जाऊन आज चार दिवस तर, नवे सरकार स्थापन होऊन तीन दिवस पूर्ण होत असताना काही संवैधानिक बाबींची पूर्तता करावयाची असताना, मात्र, राज्यात भलतीच चर्चा रंगली, असे खेदाने म्हणावे लागते. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आले. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असताना त्यांना उपमुख्यमंत्री पदावर त्यांच्या मनाविरुद्ध नियुक्ती स्विकारावी, लागल्याच्या चर्चेने आता जोर पकडला असून त्यात ब्राह्मण महासंघाने यावर जाहीर आक्षेप नोंदवला असून, ” भाजपात ब्राह्मण नेत्यांचे खच्चीकरण केले जात असल्याचा, त्यांचा आरोप आहे. केंद्रीय भाजप नेत्यांची प्रत्येक बाबीत एक व्युहरचना असते. त्या अनुषंगाने ते निवडणूकांचे राजकारण यशस्वी करण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र, ब्राह्मण महासंघाने केलेला आरोप म्हणजे ब्राह्मणांना भाजपमध्ये डावलले जात आहे, असा त्यांचा खरा आरोप आहे. तसे पाहिले तर भाजप हा ब्राह्मण – बनियांचा पक्ष आहे, असे सुरूवातीपासूनच म्हटले जाते. मात्र, या पक्षाचा जनतळ वाढविण्यासाठी भाजपचे मातृसंघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्रात राजकीय यश मिळविण्यासाठी ‘मा-ध-व’, हे समिकरण आणले. या सूत्रानुसार महाराष्ट्रात शेतकरी जात म्हणून प्रबळ सत्ताधारी असणाऱ्या मराठा समाजाप्रमाणेच मा-ध-व समिकरणातील या=माळी, ध=धनगर आणि व=वंजारी या शेतकरी जातींची एकत्रित मोट बांधून त्यांनी राज्यात भाजपचा जनतळ वाढवला. यात सुरूवातपासून वंजारी समुहातून दिवंगत गोपीनाथ मुंडे, धनगर समुहातून आण्णा डांगे आणि माळी समुदायातून ना. स. फरांदे या तीन व्यक्तींना त्यांनी नेतेपदी बसवले. त्या प्रयोगानंतर भाजपला बहुजन समाजात प्रतिनिधी मिळाले तरी, जनतळाचा विस्तार होत नसल्याने त्यांना सत्ता पदापर्यंत जाणे तर दूरच परंतु, किमान दखलपात्र प्रतिनिधित्व मिळवण्याची क्षमता विकसित होत नव्हती. त्यामुळे, शिवसेनेबरोबर दीर्घकाळासाठी युती केली. यात भाजपचे तत्कालीन नेते दिवंगत प्रमोद महाजन यांनी शिवसेनेबरोबर युती घडवून आणली. यानंतर बहुजन समाजात भाजप विस्तारत गेली, तरी भारतीय जनता पक्षाला ब्राह्मण नेतृत्व उभे करता येत नव्हते. प्रमोद महाजन हयात असताना वाजपेयी – अडवाणी यांचे केंद्रीय नेतृत्व भक्कम होते. वाजपेयी यांना सत्तारूढ करण्यात अडवाणी यांनी भरपूर योगदान दिले. मात्र, अडवाणी यांचे नाव भाजपचे मुख्य नेतृत्व म्हणून पुढे येताच पक्षावर मोदी-शहा यांचा कब्जा झाला. हा कब्जा भांडवलदारांच्या शक्तीमुळे मिळवता आला, तसे संघाच्या रणनितीचेही त्यास पाठबळ होते. तेव्हापासून आजतागायत मोदी-शहा यांचे भारतीय जनता पक्षावर पूर्ण नियंत्रण आहे. भारताच्या केंद्रीय राजकारण आणि सत्ताकारणात उत्तर भारतीय नेत्यांचा वरचष्मा असतो. पंतप्रधान पद शरद पवार यांच्या कवेत येऊनही त्यांना माघारी यावे लागले होते, हा इतिहास सर्वश्रुत आहे. याचा अर्थ मराठा नेत्याचे खच्चीकरण करण्याचा तो डाव होता, असे म्हणता येत नाही. त्याप्रमाणेच आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद न दिल्याने ब्राह्मण नेतृत्वाचे खच्चीकरण केले जात आहे, असे म्हणता येत नाही. राजकारणात स्वपक्षीय अंतर्विरोध आणि स्पर्धा असतेच. या स्पर्धेत शक्य तेवढ्या काळापर्यंत आपल्या हातात पक्षाचे सुत्र आणि नियंत्रण राहील, यासाठी प्रत्येक नेतृत्व प्रयत्न करत असते. याउलट ब्राह्मण महासंघ ब्राह्मण नेत्यांचे खच्चीकरणाचा आरोप करून आपल्याच नेत्याला एक प्रकारे दोषी ठरवत आहेत. आता बहुजन समाज आणि त्यातही छोट्या ओबीसी जाती ज्या दीर्घकाळ सत्ता वंचित ठेवण्यात सत्ताधारी जातवर्गाला यश मिळत राहीले. परंतु, आता मायक्रो ओबीसी जाती राजकीयदृष्ट्या जागृत झाल्याने त्यांना सत्तेत समावून घेऊन किंवा त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी ब्राह्मण महासंघाने पुढाकार घ्यावा, असे आम्हाला वाटते!

COMMENTS