Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षणाधिकारी मयुरेश मोरे यांनी स्वीकारला पदभार; जिल्हा परिषदेत स्वागत

बीड : जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी कुवर मॅडम यांच्या ठिकाणी शासनाने नियुक्त केलेले नवनियुक्त शिक्षणाधिकारी मयुरेश मोरे यांन

जेष्ठाच्या न्याय, हक्क सेवेसाठी सदैव कटिबध्द : न्या डॉ.सय्यद वाहब; लोकनेते गोपिनाथराव मुंडे वृद्धाश्रमात कायदेविषयक शिबिर
शिक्षणाधिकारी व शिक्षक सेनेत वादाचा प्रकार; निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप, शिक्षकांमध्ये असंतोष
मिलीया शाळेच्या अनधिकृत भागशाळा दंडासह बंद करा – अशोक तावरे

बीड : जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी कुवर मॅडम यांच्या ठिकाणी शासनाने नियुक्त केलेले नवनियुक्त शिक्षणाधिकारी मयुरेश मोरे यांनी आज (बुधवार) बीड जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षणाधिकारी (योजना) डॉ. किरण कुंवर यांचीही उपस्थिती होती. गेल्या काही महिन्यांपासून प्राथमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार योजना शिक्षणाधिकारी यांच्याकडे होता. आता मयुरेश मोरे यांच्या नियुक्तीमुळे प्राथमिक शिक्षण विभागाला कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी मिळाला आहे. नवीन शिक्षणाधिकारी मोरे यांचे उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, ऋषिकेश शेळके, कक्ष अधिकारी आनंद खेडकर तसेच इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS