Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेदमूर्ती परीक्षेत आदित्य कुलकर्णी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

देवळाली प्रवरा : वेदमूर्ती परीक्षेत आदित्य कुलकर्णी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण श्री क्षेत्र मोशी (आळंदी) येथे आयोजित वेदमुर्ती परीक्षेत देवळाली प्रवर

स्नेहल लवांडेचे दहावी परीक्षेत यश
समता इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या परीक्षेत यश 
पुणे विद्यापीठाच्या अधिष्ठातापदी डॉ. मंडलिक

देवळाली प्रवरा : वेदमूर्ती परीक्षेत आदित्य कुलकर्णी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण श्री क्षेत्र मोशी (आळंदी) येथे आयोजित वेदमुर्ती परीक्षेत देवळाली प्रवरा येथील आदित्य कुलकर्णी याने प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आदित्य हा देवळाली प्रवरा येथील विजय मधुकर जोशी गुरु यांचा नातू असून दिनेश जोशी यांचा भाचा आहे. तसेच श्रीरामपूर येथील गणेश शंकरराव कुलकर्णी यांचा तो मुलगा आहे. ही वेदमूर्ती परीक्षा स्वामी गोविंदगिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली नरसोबाचीवाडी (कोल्हापूर) येथे पार पडली. या परीक्षेसाठी आदित्यला अर्थव जोशी गुरु यांचे मार्गदर्शन लाभले. आदित्यच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS