अकोले : साहित्यिक समीक्षक डॉ. सुनील शिंदे यांना शब्दगंध साहित्य परिषद, अहिल्यानगरचा ज्येष्ठ साहित्यिक स्व. अण्णासाहेब देशमुख स्मृती साहित्य पुरस

अकोले : साहित्यिक समीक्षक डॉ. सुनील शिंदे यांना शब्दगंध साहित्य परिषद, अहिल्यानगरचा ज्येष्ठ साहित्यिक स्व. अण्णासाहेब देशमुख स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रविवारी २४ मे रोजी स्व. अरुणकाका साहित्य नगरी, जाधव लॉन्स येथे होणाऱ्या १७ व्या राज्य स्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण होणार असल्याचे परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सचिव सुनील गोसावी आणि राज्य कार्यकारिणी सदस्य सुभाष सोनवणे यांनी सांगितले.
डॉ. सुनील शिंदे यांची आजवर पंधरा पुस्तके प्रकाशित झाली असून विविध मराठी नियतकालिके, वृत्तपत्रे तसेच दिवाळी अंकांतून सातत्याने लेखन प्रसिद्ध झाले आहे. राज्य आणि विभागीय स्तरावर आजतागायत त्यांना साहित्य – सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यासाठी ३५ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मुक्त पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी लक्षणीय कार्य केले असून यापूर्वी त्यांना कै. दा.प . आपटे पत्रकारिता पुरस्कारासह राज्य स्तरीय तीन पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साहित्य, सामाजिक, आध्यात्मिक विषयाशी निगडीत सातत्यपूर्ण लेखन करणाऱ्या डॉ . शिंदे यांच्या लेखांनी वैशिष्ट्यपूर्ण चाहते आणि वाचकवर्ग निर्माण केला आहे .
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्य. विश्वस्त माजी आमदार वैभव पिचड, कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, स्वीकृत विश्वस्त मंडळ, प्राचार्य डॉ भास्कर शेळके तसेच पथिक उद्योग समूहाचे संजय देशमुख, नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त अधिकारी जयसिंग देशमुख आदींसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS