Homeताज्या बातम्या

बीड एसटी महामंडळात शिकाऊ उमेदवारांची भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागीय कार्यालयाअंतर्गत सन 2026-27 या सत्रासाठी विविध व्यवसायांमध्ये शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिये

बिंदुसरा नदीपात्र, ओपन स्पेस व व्यापारी संकुल अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेगोरगरिबांवर कारवाई अन् भू-माफियांना अभय का?- डॉ. गणेश ढवळे
मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ. शितल भोपळे यांचा पुढाकार; ११ ते १६ मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन
बीड जिल्हा शिवसेनेला मिळाला तरुण तडफदार चेहरा!इरफान कुरेशी यांची शिवसेना अल्पसंख्याक आघाडी जिल्हाप्रमुखपदी निवड



महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागीय कार्यालयाअंतर्गत सन 2026-27 या सत्रासाठी विविध व्यवसायांमध्ये शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत थेट कामाचा अनुभव मिळविण्याची सुवर्णसंधी बीड जिल्ह्यातील तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांना या निमित्ताने मिळणार आहे. कौशल्याधारित रोजगाराला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या अधिकृत एम.आय.एस पोर्टलच्या नियमानुसार ही भरती होत आहे. ही निवड प्रक्रिया प्रथम ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारून आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी केंद्र सरकारच्या अधिकृत अििीशपींळलशीहळि खपवळर.ेीस या संकेतस्थळाला भेट देऊन माहिती घ्यावी. इंटरनेट किंवा तांत्रिक अडचणी असल्यास उमेदवारांनी थेट विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, बीड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी महामंडळाच्या 02442-222580 या अधिकृत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बीड एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS